ताज्या बातम्यामहाराष्ट्ररणधुमाळी

उज्ज्वल निकम यांचे महाराष्ट्राच्या राजकारणावर मोठं भाष्य!

मुंबई : (Ujjwal Nikam On Maharashtra Politics) बंडखोर एकनाथ शिंदे यांच्यामुळे राज्यातील वातावरण ढवळून निघाले आहे. महाविकास आघाडीचे सरकार पडते की काय अशीच स्थिती निर्माण झाली आहे. पाच ते सहा दिवसांपासून सुरू झालेल्या बंडाचा अद्याप शेवट झालेला नाही. या राजकारणावर भाष्य करणारे कमी नाहीत राजकीय, सामाजिक, शासकीय, कलाकार या क्षेत्रातील लोक या बोलत आहेत. आता सत्तांतरचा संघर्ष आणखी किती दिवस चालतो याकडेच राज्याचे लक्ष लागले आहे.

दरम्यान, शिवसेनेचे नेते एकनाथ शिंदे यांनी ५० आमदारांसह बंड पुकारले आहे. यामुळे ठाकरे सरकार अडचणीत आली आहे. शेवटी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी पुढे येत महाविकास आघाडीचे सरकार वाचवण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत. दुसरीकडे बंड पुकारलेल्या आमदारांविरुद्ध शिवसैनिक आक्रमक झाल्याचे पाहायला मिळत आहे. अनेक बंडखोरांचे ऑफिस शिवसैनिकांनी फेडले आहेत. यामुळे केंद्राकडून आमदारांच्या घराबाहेर सीआरपीएफची सुरक्षा पुरविण्यात आली आहे.

रंगलेल्या राजकीय नाट्याच्या परिस्थितीवर ज्येष्ठ सरकारी वकील उज्ज्वल निकम यांनी मिश्किल टिप्पणी केली आहे. सोयरीक एकाशी, लग्न दुसऱ्याशी, मंगळसूत्र तिसऱ्याचे आणि गर्भ चौथ्याचा’ अशी सध्याच्या राजकारणाची स्थिती झाल्याचे उज्ज्वल निकम म्हणाले.सध्याची राजकीय परिस्थिती अक्षरशः: वीट आणणारी आहे. पक्षांतरबंदी कायदा आणखी सक्षम करण्याची गरज आहे. सध्याच्या परिस्थितीत उपाध्यक्ष काय निर्णय देतात, यावर राजकीय कोंडीचे भविष्य आहे, असे उज्ज्वल निकम पत्रकारांशी संवाद साधताना म्हणाले.

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये