‘गजरा मोहब्बत वाला’… उर्फी आली अन् फॅशनचा रेकॉर्डचं तोडून गेली

Urfi Javed New Viral Video : उर्फी जावेद तिच्या फॅशन सेन्ससाठी तसंच तिच्या वक्तव्यांमुळे नेहमीच सोशल मीडियावर प्रसिद्धीच्या झोतात असते. उर्फी सोशल मिडियावर व्हिडिओ शेअर करत असते ज्यात ती तिची फॅशन दाखवत असते. मात्र, उर्फी ही तिच्या विचित्र फॅशनसाठी ओळखली जाते आणि ती तिची ओळख कायम ठेवणार असल्याचं तिनं सांगितलं. आत्तापर्यंत लोकांनी उर्फीला पोत्यापासून ब्लेड, लोखंडी साखळी, इलेक्ट्रिक वायर ते मोबाइल सिम, काच सायकलची चेन, चिमटे इतकच नाही तर किवी च्या फळापासून बनवलेल्या ड्रेसमध्ये पाहिलं आहे.
इतकच नाही तर आपल्या कल्पना शक्तीच्या पलिकडे तिची फॅशन असते. आता नुकताच तिने तिचा एक व्हिडिओ सोशल मिडियावर शेअर केला आहे. जो काही क्षणातच व्हायरल झाला आहे. यावेळी तिने अंगावर कपडे नाही तर गजरे लावले आहे. होय तिनं तिच्या शरीराचा काही भाग हा गजऱ्यानं लपवला आहे. तिच्या हातला आलता लावला आहे. तिच्या या व्हिडिओच्या मागे जुनं गाण लावलं आहे. तिचा हा लुक नेटकऱ्यांना मुळीच आवडलेला नाही.
उर्फी जावेदने रविवारी आपला बोल्ड व्हिडिओ शेअर करून चाहत्यांना वेड लावले आहे. तिने तिच्या इंस्टाग्राम अकाउंटवर एक व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की उर्फी जावेदने गजरा फ्लॉवर स्कर्ट बनवला आहे. त्याचबरोबर टॉपलेस होऊन तिने गजराच्या फुलांनी हात आणि अंग झाकले आहे. उर्फी जावेदने व्हिडिओसोबतच्या कॅप्शनमध्ये एक फूल पोस्ट केले आहे.
त्यांनी पुन्हा तिला ट्रोल करण्यास सुरवात केली आहे. एकाने लिहिलय की सुरवातीला गजरा पाहून वाटलं की उर्फी ही पांरपारिक ड्रेसमध्ये दिसेल मात्र नंतर भ्रमनिरास झाला. तर दुसऱ्याने लिहिलयं की, ‘रमजान सुरु आहे त्याचा तरी विचार करं’. एका यूजरने लिहिले आहे की, ‘ती वेडी झाली आहे, लाज नाही वाटत.’ एका यूजरने लिहिले आहे की, ‘या सगळ्यातून काय हवंय? अशा अनेक प्रतिक्रिया देत नेटकऱ्यांनी तिच्यावर टिका केली आहे.