ताज्या बातम्यामुंबई

कुणी घर देत का घर… उर्फी जावेदला भाड्याने मिळेना, म्हणाली…

मुंबई | विचित्र फॅशन आणि तोकड्या कपड्यांमुळे वादात असलेली मॉडेल उर्फी जावेद (Urfi Javed) आता वेगळ्याच समस्येला तोंड देत आहे. उर्फीला (Urfi Javed) मुंबईत राहण्यासाठी भाड्याने घर हवं आहे, पण तिला कुणीही घर देत नाहीये. तिने यासंदर्भात ट्वीट केलंय आणि मुंबईत तिला भाड्याने घर का मिळत नाहीये याचे कारण सांगितले आहे.

तिच्या कपड्यांमुळे आणि धर्मामुळे घर भाड्याने मिळत नसल्याचं उर्फी ट्वीटमध्ये म्हणत आहे. “माझ्या कपड्यांमुळे मुस्लीम मालक मला घर भाड्याने देत नाहीत, मी मुस्लिम आहे म्हणून हिंदू मालक मला भाड्याने देत नाहीत. काही मालकांना मला मिळणाऱ्या राजकीय धमक्यांची भीती वाटते. मुंबईत (Mumbai) भाड्याने अपार्टमेंट शोधणे खूप अवघड आहे,” असं उर्फीने ट्वीटमध्ये म्हटलं आहे.

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये