ताज्या बातम्यामनोरंजन

“मी माझ्या कपड्यांमुळे…”; कंगनाच्या ट्विटला उर्फिचे उत्तर

मुंबई | ट्विटरवर कंगनाचा (Kangna Ranaut) कमबॅक झालाय. कंगना रानौत सोशल मीडियावर नेहमी सक्रीय असते. सोशल मीडियाच्या माध्यमातून ती आपले विचार आणि मत व्यक्त करत असते. ट्विटरवर सक्रीय झाल्या झाल्या कंगनाने ‘पठाण’ (Pathaan) सिनेमाबद्दल ट्विट केलं होत. परखड भूमिका मांडणाऱ्या दोन अभिनेत्री आता समोरासमोर आल्यात. कंगना रनौत आणि मॉडेल उर्फी जावेद (Urfi Javed) यांच्यामध्ये ट्विटर वॉर पाहायला मिळत आहे. काही दिवसांपूर्वी कंगनाने हिंदू आणि मुस्लीम अभिनेते यांच्याबद्दल ट्विट केले होते. त्यात ती म्हणाली होती की, प्रेम फक्त खान यांना मिळतं. एवढंच नाही, तर हा वाद युनिफॉर्म सिव्हिल कोडपर्यंत पोहोचला. कंगनाच्या ट्विटवर आता मॉडेल उर्फी जावेद हिने उत्तर दिलं आहे.

कंगनाचे ट्विट

‘माझी प्रिय उर्फी… असं जर झालं असतं तर हे एक आदर्श जग असतं. पण हे शक्य नाही’ जोपर्यंत युनिफॉर्म सिव्हिल कोड येत नाही, तोपर्यंत हा देश संविधानाने विभाजलेला दिसेल. त्यामुळे आपण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे युनिफॉर्म सिव्हिल कोडची मागणी करू.. करूया ना? असा प्रश्नचिन्ह देखील कंगनाने यावेळी उपस्थित केला.

उर्फिचे उत्तर

उर्फी म्हणते, ‘युनिफॉर्मचा विचार माझ्यासाठी योग्य नाही… कारण मी फक्त माझ्या कपड्यांमुळे प्रसिद्ध आहे…’ उर्फीचं ट्विट सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. दरम्यान, कंगना आणि उर्फी दोघींमध्ये ट्विटरवॉर सुरु असताना, आता कंगना उर्फीच्या ट्विटचं काय उत्तर देते हे पाहाणं रंजक ठरणार आहे.

urfi 01 300x197 1

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये