क्रीडाताज्या बातम्यामनोरंजन

ऋषभ पंतच्या अपघातानंतर उर्वशी रौतेलाची ‘ती’ पोस्ट चर्चेत

मुंबई | Rishabh Pant –टीम इंडीयाचा (Team India) महत्त्वाचा खेळाडू ऋषभ पंत (Rishabh Pant) याच्या कारला भीषण अपघात (Accident) झाला आहे. या अपघातामध्ये ऋषभ पंत गंभीर जखमी झाला आहे. दिल्लीहून घरी जात असताना हम्मदपूर येथे हा अपघात झाला. ऋषभची कार डिव्हायडरला धडकली. त्यानंतर कारने पेट घेतला. मात्र, या अपघातातून ऋषभ थोडक्यात बचावला आहे. त्याला दिल्लीच्या रुग्णालयात तातडीनं दाखल केलं असून सध्या त्याच्यावर उपचार सुरू आहेत. तसंच ऋषभचे चाहते तो लवकर बरा व्हावा यासाठी प्रार्थना करत आहेत. या दरम्यान, अभिनेत्री उर्वशी रौतेलानं (Urvashi Rautela) एक पोस्ट शेअर केली असून ती पोस्ट चांगलीच चर्चेत आहे.

उर्वशी रौतेला आणि ऋषभ पंत यांच्यातील वाद सर्वश्रुत आहे. काही दिवसांपूर्वीच त्या दोघांमध्ये इन्स्टा वॉर रंगलं होतं. त्यामुळे ते दोघे चांगलेच चर्चेत आले होते. तसंच आता ऋषभच्या अपघाताची माहिती मिळताच उर्वशीनं एक पोस्ट शेअर केली आहे. तिनं या पोस्टमध्ये दिलेल्या कॅप्शननं सर्वांचंच लक्ष वेधून घेतलं आहे.

उर्वशीनं तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर तिचा एक फोटो पोस्ट केला आहे. या फोटोला तिनं ‘प्रार्थना करत आहे’, असं कॅप्शन दिलं आहे. सोबत तिनं पांढऱ्या रंगाचा हार्ट इमोजीही पोस्ट केला आहे. त्यामुळे तिची ही पोस्ट चांगलीच चर्चेत आहे. तिच्या या पोस्टवर तिच्या अनेक चाहत्यांनी कमेंट केल्या आहेत.

दरम्यान, ऋषभ पंत स्वत: गाडी चालवत होता. गाडी चालवताना झोप आल्यानं हा अपघात झाल्याची माहिती सूत्रांकडून समोर येत आहे. ऋषभ पंत गाडीत एकटाच होता. अपघात झाल्यानंतर गाडीला आग लागली. स्थानिकांनी त्याला रुग्णालयात दाखल असून त्याच्यावर उपचार सुरु आहेत. ऋषभची प्रकृती सध्या स्थिर असल्याची माहिती मिळत आहे.

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये