ताज्या बातम्या

सुषमा अंधारेंच्या व्याख्यानावरून पुन्हा वाद पेटला

अमरावती | शहरात शिवजयंतीनिमित्त (Shivjayanti 2023) सुषमा अंधारे (Sushma Andhare) यांच्या व्याख्यानाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. मात्र व्याख्यानापूर्वी चांदूर रेल्वे येथील वारकरी मंडळ, बजरंग दल व भाजपचे कार्यकर्ते आक्रमक झाले आहेत. कार्यक्रमापूर्वी प्रमुख वक्त्या असणाऱ्या सुषमा अंधारे आणि आयोजकांना समज द्यावी यासाठी वारकरी मंडळाच्या वतीनं चांदूर रेल्वे पोलिसांना निवेदन देण्यात आलं आहे.

सुषमा अंधारेंचा आजपर्यंतचा इतिहास पाहाता त्यांचे हिंदू देवी देवतांबद्दलचे भाषण हे नेहमीच वादग्रस्त ठरले आहे. त्यामुळे त्यांच्या व्याख्यानाने सामाजिक तेढ निर्माण होऊ नये यासाठी अंधारे यांना आणि आयोजकांना समज देण्यात यावी अशी मागणी या निवेदनातून करण्यात आली आहे. याच दरम्यान सुषमा अंधारे यांच्याविरोधात यापूर्वी देखील वारकरी समाज आक्रमक झाल्याचं पहायला मिळालं आहे. सुषमा अंधारे या ज्या पक्षात असतील त्या पक्षाला मतदान न करण्याची शपथ वारकऱ्यांनी घेतली होती. तसेच वारकरी संघटनेकडून अंधारे यांच्याविरोधात तक्रार देखील दाखल करण्यात आली होती. आता पुन्हा एकदा वरकऱ्यांनी निवेदन दिलं आहे.

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये