‘…पवार साहेब आता तरी सन्यास घ्या, गप घरी बसा’- निलेश राणे

मुंबई : राज्य शासनात विलिनीकरणाच्या मागणीसाठी पाच महिन्यांपासून आंदोलन करत असलेल्या एसटी कर्मचाऱ्यांनी आज पुन्हा एकदा आक्रमक भूमिका घेतली आहे. महाविकास आघाडीचे ज्येष्ठे नेते आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या मुंबईमधील सिल्वर ओक या निवास्थानाबाहेर त्यांनी आंदोलन सुरू केलं आहे. दरम्यान या परिसरात कर्मचारी आक्रमक झाले असून कोर्टाचा निर्णय मान्य नसल्याचे त्यांनी सांगितलं आहे. या संपूर्ण परिस्थितीला शरद पवार जबाबदार असल्याचा आरोप कर्मचाऱ्यांनी केला आहे. एसटीच्या विलीनीकरणावर अद्याप कर्मचारी ठाम आहेत. तसंच यासंदर्भात आता राजकीय वर्तुळातून प्रतिक्रिया येत आहेत. भाजपाचे निलेश राणे यांनी शरद पवारांवर सडकून टीका केली आहे.
भाजपाचे निलेश राणे यांनी ट्विट केलं आहे. यात ते म्हणतात, काय उपयोग 50 वर्ष राजकारणात असून? सामान्य लोकं घरावर चप्पल आणि दगडी घेऊन आले. आयुष्यभर घाणेरडं राजकारण केल्यावर काय परिणाम होतो याचं उत्तम उदाहरण म्हणजे हा व्हिडिओ असं म्हणत त्यांनी एक व्हिडिओ पोस्ट केला आहे. पवार साहेब आता तरी सन्यास घ्या, गप घरी बसा, असा सल्लाही निलेश राणे यांनी दिला आहे.