मनोरंजनमहाराष्ट्र

ज्येष्ठ लावणीसम्राज्ञी सुलोचना चव्हाण अनंतात विलीन; शासकीय इतमामात अंत्यसंस्कार

मुंबई : ज्येष्ठ लावणीसम्राज्ञी सुलोचना चव्हाण यांच्यावर मुंबई येथे शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी त्यांचे पुत्र विजय चव्हाण यांनी त्यांना मुखाग्नी दिला. यावेळी शिक्षणमंत्री दीपक केसरकर, सुलोचनाबाई यांच्या कुटुंबातील सदस्य तसेच इतर अनेक कलावंत उपस्थित होते. ज्येष्ठ लावणीसम्राज्ञी सुलोचना चव्हाण यांनी वयाच्या 89 व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला. वृद्धापकाळाने त्यांचं निधन झालं.

सुलोचनाबाईंनी वयाच्या अवघ्या नवव्या वर्षापासून गायनाला सुरुवात केली. कृष्ण सुधामा या हिंदी चित्रपटात त्यांनी पहिलं गाणं गायलं. माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले, ‘सुलोचना चव्हाण. गायन क्षेत्रामधील एक दिग्गज व्यक्ती ज्यांचं नाव घेतलं की तीच व्यक्ती समोर येते त्यांच्यापैकीच एक त्या होत्या. त्या मनामध्ये कायम राहणाऱ्या व्यक्ती होत्या. मी शिवसेनेच्या आणि माझ्या कुटुंबियाच्या वतीने त्यांना श्रद्धांजली वाहतो.’

सुलोचना चव्हाण यांना अनेक पुरस्कार मिळाले आहेत. महाराष्ट्र सरकारचे दोन जीवनगौरव पुरस्कार, लता मंगेशकर पुरस्कार, पुणे महापालिकेतर्फे राम कदम पुरस्कार, ‘मल्हारी मार्तंड’साठी मिळालेला सर्वोत्कृष्ट लावणी गायिकेचा सन्मान, अशा अनेक पुरस्कारांनी त्यांना गौरवण्यात आलं होतं.

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये