‘मलायकाच्या मागे ड्रोन सोडला की काय?’ नेटकऱ्यांचा विरल भयानीला सवाल!

(Viral Bhayani On Malaika Arora) मनोरंजन क्षेत्रात बाकी कोणाची चर्चा होवो किंवा नाही होवो पण बाॅलीवूड अभिनेत्री मलायका अरोराची मात्र, नेहमीच चर्चा होत असते. त्याचे कारण ही तसेच आहे, तिचं दिसणं, तिचा फिटनेस, तिच्या चाहत्यांचा भुरळ घालणाऱ्या अदा याच्या नेहमीच मोठ्या प्रमाणावर मिळताना दिसत आहे. मलायकाचा फोटो पाहिल्यानंतर वयाची चाळीशी पार केल्यानंतर देखील कुणी एवढं सुंदर आणि आकर्षक असू शकते का? असा प्रश्न पडतो.
मलायकाचे वेगवेगळ्या अंदाजातील फोटोंना नेटकऱ्यांची पसंती मिळताना दिसत आहेत. विरल भयानीनं मलायकाचे काही लेटेस्ट व्हिडिओ शेयर केले आहेत. तिचे हे व्हिडिओ पाहून फॉलोअर्सनं भन्नाट कमेंटस केल्या आहेत. विरल भयानीच्या इंस्टावर मलायकाचे रोजचे अपडेटेड फोटो येत असल्यानं नेटकऱ्यांना त्याच्याविषयी भलतेच कुतूहल आहे. तू काय मलायकाच्या मागे ड्रोन सोडला की काय? असा प्रश्न नेटकऱ्यांनी त्याला विचारला आहे.
मलायकाचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होताच ते पाहून कमेंट करण्यासाठी नेटकऱ्यांची धांदल उडते. बॉलीवूडमधील प्रसिद्ध फिटनेस फ्रीक पर्सनॅलिटी म्हणून मलायकाकडे पाहिले जाते. सध्या मलायका आणि अर्जुन कपूर यांच्या लग्नाची चर्चा चर्चेत आली आहे. मलायकानं देखील आपण यावर्षी लग्नाचे प्लॅनिंग करत असल्याचे म्हटले आहे.