ताज्या बातम्यापिंपरी चिंचवडपुणेमहाराष्ट्ररणधुमाळीसिटी अपडेट्स

“Who Is Dhangekar”, ‘त्या’ वक्तव्यावर चंद्रकांत पाटील स्पष्टच बोलले; म्हणाले…

पिंपरी चिंचवड | Chandrakant Patil – पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांनी कसबा विधानसभा पोटनिवडणुकीतील (Kasba Bypoll Election) प्रचारादरम्यान रवींद्र धंगेकर (Ravindra Dhangekar) यांच्यावर निशाणा साधला होता. ‘Who Is Dhangekar’ असं म्हणत त्यांनी धंगेकरांना हिणवलं होतं. मात्र, कसब्यात काँग्रेसनं बाजी मारल्यानंतर ‘मी आहे धंगेकर’ असं प्रत्युत्तर नवनिर्वाचित आमदार रवींद्र धंगेकर यांनी दिलं. यासंदर्भात चंद्रकांत पाटील यांना विचारले असता त्यांनी ‘ठीक आहे’ म्हणत बोलणं टाळलं. ते आज (4 मार्च) पिंपरी-चिंचवड दौऱ्यावर आहेत.

संपूर्ण महाराष्ट्राचं कसबा पेठ विधानसभेच्या पोटनिवडणुकीकडे लक्ष्य लागलं होतं. तसंच कसबा हा भाजपचा (BJP) गड मानला जात होता. सलग 28 वर्षे हा मतदारसंघ भाजपकडे होता. त्यानंतर आता झालेल्या पोटनिवडणुकीत काँग्रेसनं (Congress) भाजपचा हा गड हिसकावून घेत बाजी मारली आहे.

दरम्यान, चंद्रकांत पाटील यांनी प्रचारादरम्यान महाविकास आघाडीकडून लढत असलेले काँग्रेसचे उमेदवार रवींद्र धंगेकर यांच्याबाबत बोलताना ‘हू इज धंगेकर’ असं विधान केलं होतं. मात्र, याच धंगेकरांनी भाजपचा 28 वर्षांचा गड हिसकावून घेतला. त्यानंतर ‘मी आहे धंगेकर’ असं प्रत्युत्तर आमदार रवींद्र धंगेकर यांनी दिलं आहे. त्यावर चंद्रकांत पाटलांना तुम्ही म्हणालात हू इज धंगेकर, कसब्याचे आमदार म्हणाले की मी आहे रवी धंगेकर याबाबत विचारलं असता पाटील हो, ठीक ठीक चला असं म्हणत त्यांनी यावर बोलणं टाळलं.

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये