विराट आणि अनुष्का पोहोचले महाकालेश्वर मंदिरात; पाहा व्हिडीओ
Virat Kohli And Anushka Sharma At Mahakal Temple : भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यात इंदोर येथे तिसरा कसोटी सामना पारपडल्यानंतर भारताचा स्टार क्रिकेटर विराट कोहलीने आपली पत्नी अनुष्का शर्मा सह उज्जेनच्या महाकालेश्वर मंदिराला भेट दिली. कसोटी सामन्यापूर्वी क्रिकेटर के एल राहुल आणि अक्षर पटेल यांनीदेखील आपल्या पत्नींसोबत महाकालेश्वर मंदिरात दर्शन घेतले होते. आता देखील विराट आणि अनुष्का देखील महाकालेश्वर मंदिरात पोहोचले आहेत. महाकालेश्वर मंदिरात शंकराच्या भक्तीत तल्लीन झालेल्या विराट आणि अनुष्का यांचे काही फोटो आणि व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहेत.
आज सकाळी ४ वाजता विराट आणि अनुष्का मंदिरात आरती करताना दिसले. महाकालेश्वर मंदिरात शंकराच्या दर्शनासाठी गेलेल्या विराटने पारंपरिक ड्रेस घातला होता, तर दुसरीकडे अनुष्काने बेबी पिंक रंगाची साडी नेसली आहे. शंकराची आरती करताना विराट आणि अनुष्काचा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहेत. महत्त्वाचं म्हणजे विराट आणि अनुष्का कायम त्यांची मुलगी वामिका हिच्यासोबत तिर्थ स्थळावर पोहोचतात पण आता दोघे मुलीला न घेता आले आहेत.
महाकालेश्वर मंदिराबाबत भारतीय क्रिकेटर्सना खूप आस्था आहे. विराट अनुष्का यावेळी बराच काळ मंदिरात उपस्थित होते. याचे व्हिडिओ आणि फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. काही दिवसांपूर्वी विराट कोहली आणि अनुष्का शर्मा यांनी बाबा नीम करौली यांच्या आश्रमाला भेट दिली होती. यावेळी त्यांनी मुलगी वामिका सह प्रवचन श्रवण केले. तसेच बॉर्डर गावस्कर ट्रॉफीला सुरुवात होण्यापूर्वी विराट अनुष्का यांनी ऋषिकेशमधील स्वामी दयानंद सरस्वती यांच्या आश्रमाला देखील भेट दिली होती.