क्रीडाताज्या बातम्यादेश - विदेश

विराट कोहली अपघातातून थोडक्यात बचावला! श्रीलंकेतला Video आला समोर

Virat Kohli Viral Video : रोहित शर्माच्या (Rohit Sharma) नेतृत्वाखाली टीम इंडिया (Team India) एशिया कपच्या फायनलमध्ये (Asia Cup Final) खेळण्यासाठी सज्ज झाली आहे. रविवारी 17 सप्टेंबरला भारत आणि श्रीलंका (India vs Sri Lanka) आमने सामने येणार असन कोलंबोच्या प्रेमदासा स्टेडिअमवर हा सामना खेळवला जाणार आहे.

भारतीय वेळेनुसार दुपारी तीन वाजता अंतिम सामन्याला सुरुवात होईल. एशिया कप स्पर्धेच्या इतिहासत भारताने आतापर्यंत सर्वाधिक सात वेळा जेतेपद पटकावलं आहे आणि आता आठव्यांदा टीम इंडिया एशिया कपवर नाव कोरणार का याकडे भारतीय क्रिकेट चाहत्यांच लक्ष लागलं आहे.

अंतिम सामन्याआधी टीम इंडियाला सुपर-4 च्या शेवटच्या सामन्यात बांगलादेशविरुद्ध पराभव पत्करावा लागला. य सामन्यात पाच प्रमुख खेळाडूंना विश्रांती देण्यात आली होती. यात स्टार फलंदाज विराट कोहलीचाही (Virat Kohli) समावेश होता. विशेष म्हणजे मैदानाबाहेर असतानाही विराट कोहली चर्चेत होता.

सामन्यात विराटने वॉटरबॉयची भूमिका बजावली. मैदानात पाणी घेऊन येताना अतरंगी हावभाव करत असतानाचा त्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला होता. आता विराटचा आणखी व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. यात विराट कोहली एका गाडीला धडकण्यापासून थोडक्यात बचावताना दिसतोय.

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये