राष्ट्रसंचार कनेक्टसंपादकीय

असा रंगतो रिंगण सोहळा…… वारी जनातली, जनांच्या मनातली…

नाम गाऊ नाम घेऊ | नाम विठोबाला वाहू ||
आम्ही दैवाचे दैवाचे | दास पंढरीरायाचे ||
टाळ विना घेऊनि हाती | विठ्ठल नाम गाऊ गीती ||
नामा म्हणे लाखोली सदा | सहस्त्र नामाची गोविंदा ||

जीवन हे अखंडित चक्रासारखे चाललेले आहे. त्याला गतीही आहे, आणि वेगही आहे. फरक फक्त इतकाच कोणाचा वेग जास्त आहे तर कोणाचा कमी आहे. चक्रावर असलेला सगळ्यात खालचा बिंदू कधीतरी वर जाणार आणि वरचा बिंदू खाली येणार. चक्रावरचे हे दोन बिंदू सुख आणि दु:ख मानले तर, प्रत्येकाच्या जीवनात सुखदु:खाचा चाललेला लपंडाव दिसून येतो.
हे ख मानले तरी वैष्णवांची गोष्टच काही वेगळी आहे.

आयुष्यात कोणत्याही गोष्टीकडून अपेक्षा ठेवल्या की दु:खच पदरी पडते. या आयुष्यात सगळ्यात आसक्ती लावणारा विषय संसार आहे. जीवनात असलेल्या या आसक्तीची विरक्ती केली की अपेक्षा भंगाचे दु:ख आपोआपच कमी होते. काहीही केले तरी संसाराचा हा फेरा पार करून सगळ्यांनाच पैलतीरी जायाचे आहे.

दिंडी सोहळ्यात आत्मोन्नती करणार्‍या अनेक गोष्टी घडत असतात. दिंडीच्या मार्गावर होणारा रिंगण सोहळा हे याचे उत्तम उदाहरण आहे. कोणत्याही सरळ षेला सुरुवातीचा आणि शेवटाचा बिंदू असतो. रिंगण म्हणजे वर्तुळ, ज्याप्रमाणे कोणत्याही बिंदुपासून सुरू केल्यानंतर पुन्हा त्याच बिंदुला येऊन पोहोचणे म्हणजेच वर्तुळ पूर्ण करणे होते.

त्याचप्रमाणे परमार्थात प्रवेश करण्यासाठी कोणतेही विशेष वय असायलाच पाहिजे असे ठरलेले नाही. ज्याला आपल्या जीवनाचा खरा अर्थ समजावून घ्यायचा आहे त्याने या वर्तुळात कधीही प्रवेश केला तरी चालतो. आणि वैष्णव धर्माचे पालन करीत तो जेव्हा पुन्हा ‘को अहम्’ असे म्हणत म्हणत या सुरुवातीच्या बिंदुकडे येतो तेव्हा त्याला जीवनाचे सार समजलेले असते.

दिंडी सोहळ्यात एकूण सात रिंगण सोहळे होतात. शरीरातल्या सप्त चक्राची आणि रिंगण सोहळ्याची काही विचारवंतांनी सुख गुंफण केली आहे. शरीरातील सप्तचक्र जागृत होत असताना आत्मोन्नतीचा मार्ग साधकाला गवसतो. रिंगण सोहळ्यातही वारकरी आत्मोन्नतीच्या मार्गाला जातो असे मानले जाते. वातावरणात निर्माण होणारा प्रत्येक ध्वनी शरीरात अनेक कंपने उत्पन्न करतो. ध्वनी ही शक्ति आहे हे विज्ञानाने मानले आहे. माऊलींच्या रिंगणात एका तालात, एका सुरात वाजणा टाळ, मृदुंग किती प्रचंड प्रमाणात ऊर्जा निर्माण करत असतील ? ही उत्पन्न होणारी ऊर्जा शरीरातल्या या चक्रांना गती देण्याचे काम करते.

आत्मोन्नतीच्या मार्गावर बोट धरून चालवते.
पंढरीची वाट | दिंड्या पताका लोळती ||
देवा माज्या विठ्ठलाचं | साधु रिंगानं खेळती ||
पंढरीची वाट | कशानं ग झाली लाल ||
ज्ञानदेव नामदेव | इथं येऊन गेले काल ||

दिंडी सोहळ्यात एकूण सात रिंगण सोहळे होतात. शरीरातल्या सप्त चक्राची आणि रिंगण सोहळ्याची काही विचारवंतांनी सुख गुंफण केली आहे. शरीरातील सप्तचक्र जागृत होत असताना आत्मोन्नतीचा मार्ग साधकाला गवसतो. रिंगण सोहळ्यातही वारकरी आत्मोन्नतीच्या मार्गाला जातो असे मानले जाते. वातावरणात निर्माण होणारा प्रत्येक ध्वनी शरीरात अनेक कंपने उत्पन्न करतो. ध्वनी ही शक्ति आहे हे विज्ञानाने मानले आहे. माऊलींच्या रिंगणात एका तालात, एका सुरात वाजणा टाळ, मृदुंग किती प्रचंड प्रमाणात ऊर्जा निर्माण करत असतील ? ही उत्पन्न होणारी ऊर्जा शरीरातल्या या चक्रांना गती देण्याचे काम करते.

त्याचबरोबर रिंगण सोहळा हा नवविधा भक्तीतील नमन व प्रदक्षिणा या प्रकारचा विधी आहे. वैष्णवांचा स्वाभाविक धर्म नमन आहे. रस्त्यात घडणार्‍या प्रत्येक रिंगणात जागेवर वारकारर्‍यांसोबत माऊली स्वत: रिंगण खेळते. रिंगणात माऊली येण्याच्या काही वेळ आधी राज्याच्या कानाकोपर्‍यातून आलेले रांगोळी कलाकार माऊलीच्या स्वागतासाठी रांगोळी टाकतात. आपल्या लेखांचे सुलेखनकार डॉ तेजस लोखंडे हेही त्यात अग्रभागी असतात.

नगारखाना दिंडीच्या आगमनाची वर्दी देतो. त्यानंतर दिंडी क्रमांकानुसार आपल्या जागेवर रिंगणात उभ्या रहातात. रिंगणाच्या (उभ्या-गोल) रचनेनुसार दिंडींची रचना असते. रिंगणात उभे वारकरी निरनिराळ्या ‘पाऊली’ (टाळ वाजवत पुढे-मागे होत) खेळत असतात. रिंगण मैदानाजवळ माऊलीचा रथ आल्यानंतर, दिंडीच्या मधल्या मोकळ्या मार्गातून पालखी रिंगणाच्या केंद्रबिंदुकडे जाते.

या मार्गाभोवती असलेले पताकावाले आपल्या झेंड्यांचा स्पर्श माऊलीच्या पालखीला करतात. टाळ, मृदुंगाचा आवाज एका विशेष लयीत चाललेला असतो. संपूर्ण तळावर ‘ज्ञानोबा-तुकाराम’चा गजर टिपेला पोहोचलेला असतो. या आवाजाच्या तालावर आणि ‘ज्ञानोबा-तुकाराम’च्या बोलावर आजूबाजूचा समस्त समाज आणि निसर्ग डोलत असतो. पालखी आपल्या गतीने केंद्रस्थानी जात असते. केंद्रस्थानी उभारलेल्या शामियान्यात पालखी विराजमान होते.

Related Articles

Leave a Reply

Check Also
Close
Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये