माय लिडरराष्ट्रसंचार कनेक्ट

पक्ष नेतृत्वाचा आदेश सर्वस्वी मानणारे चंद्रकांत दादा

गजानन चोरमले

मागील चार दिवसात जे सत्तांतर झाले त्यात चंद्रकांत दादा पाटील यांचे मोलाचे योगदान आहे. दादा अनेक वर्ष पक्ष संघटनेचे काम यशस्वीपणे पार पाडत आहेत. आणि आता ही पक्ष नेतृत्वाने संघटनात्मक काम त्यांच्यावर सोपावले आहे. महाविद्यालयीन जीवनापासून ते संघटनात्मक कामे चांगल्या प्रका पुर्ण करतात. विद्यार्थी दशेत परिषदेतील संघटनात्मक बांधणीचे त्यांच्यातील गुणवैशिष्ट्य, नियोजन कौशल्य, अभ्यासू व्यक्तिमत्व हे सर्व संघटनात्मक गुण ओळखूनच भाजप पक्षश्रेष्ठींनी त्यांना महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष या पदावर नियुक्त केले आहे.

यापुढील काळात ही पक्षाने त्यांना मंञीमंडळात न करता पक्ष वाढीसाठी काम करण्यास सांगितले आहे. दादा सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते या सर्वांना सोबत घेऊन पाटील काम करतात. यामुळे त्यांची एक वेगळी ओळख निर्माण झाली आहे. अमित शहा यांचे खास विश्वासू म्हणून त्याची ओळख आहे. राजकीय जीवनात प्रवेश करून त्यांनी भारतीय जनता पक्षाचे काम करण्यास सुरूवात केली. आजपर्यंत त्यांच्यावर जास्त प्रमाणात पक्ष संघटनेची जबाबदारी सोपविण्यात आली आहे. 2004 मध्ये त्यांची प्रदेश सरचिटणीस पदी नियुक्ती झाली. सन 2009 मध्ये पक्षाने त्यांना पुणे पदवीधर मतदार संघातून निवडणूक लढवण्यासाठी उमेदवारी दिली.

या निवडणुकीत शरद पाटील यांचा मोठ्या मताधिक्याने पराभव करून विधान परिषदेत पाटील यांचा प्रवेश झाला. सन 2013 मध्ये त्यांच्यावर पक्षाच्या प्रदेश उपाध्यक्ष पदाची जबाबदारी देण्यात आली. यानंतर 2014 मध्ये झालेल्या पुणे पदवीधर मतदार संघाच्या निवडणुकीत त्यांनी पुन्हा विजय संपादन करत, विधान परिषदेत पुन्हा प्रवेश केला. सन 2014 च्या विधानसभा निवडणुकीत भारतीय जनता पक्षाने दणदणीत विजय मिळवत, सरकार स्थापन केले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मंत्रिमंडळात चंद्रकांत दादा त्यांच्याकडे सहकार, पणन, सार्वजानिक बांधकाम आदी विभागाची मंञीपदे सोपवण्यात आली. 2016 पासून ते महसूल, सार्वजनिक बांधकाम या खात्यांचे मंञीपदे दिली गेली. पुढे देवेंद्र फडणवीस यांनी पाटील यांच्याकडे कृषी खात्याचा कार्यभार सोपवला होता. या काळात त्यांनी अनेक कामे मार्गी लावली आणि जनतेची सेवा केली. त्यामुळेच कोणत्याही निवडणुकीत भाजपला जनतेचा मतदान रुपी आशीर्वाद मिळत आहे.

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये