ताज्या बातम्यादेश - विदेशमनोरंजन

अक्षय कुमारचं वाढदिवसानिमित्त चाहत्यांना खास गिफ्ट; शेअर केला ‘वेलकम टू द जंगल’चा मजेशीर टीझर

Welcome to the Jungle Teaser : बॉलिवूडचा खिलाडी अशी ओळख असणाऱ्या अक्षय कुमारचा (Akshay Kumar) 56 वा वाढदिवस पार पडला. अभिनेत्याचा वाढदिवस म्हणल्यावर गाजावाजा तर होणारच. त्यानिमित्ताने त्याला अनेक जणांनी सोशल मीडियावर पोस्ट शेअर करुन वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.

दरम्यान, अक्षयनं देखील आपल्या वाढदिवसानिमित्त चाहत्यांना खास गिफ्ट दिलं आहे. त्यानं ‘वेलकम टू द जंगल’ (Welcome to the Jungle) या चित्रपटाचा मजेशीर टीझर सोशल मीडियावर शेअर केला आहे.

‘वेलकम टू द जंगल’ हा चित्रपट सोशल मीडियावर शेअर करुन अक्षयनं कॅप्शनमध्ये लिहिलं, ‘मी स्वत:ला आणि तुम्हा सर्वांना माझ्या वाढदिवसाची भेट देत आहे. तुम्हाला हे आवडल्यास मला धन्यवाद म्हणा, मी याला वेलकम-3 म्हणत आहे.’

‘वेलकम टू द जंगल’ या चित्रपटाच्या टीझरमध्ये अक्षय कुमारसोबतच दिग्गज कलाकार देखील दिसत आहेत. ‘वेलकम टू द जंगल’मध्ये 24 कलाकार कॅपेला सादर करताना दिसणार आहेत.

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये