IND Vs WI, 1st T20 : ‘मिशन टी-20’; युवा टीम इंडियासमोर अनुभवी विडिंजचे आव्हान
West Indies vs India 1st T20I : भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यामध्ये आजपासून पाच सामन्याच्या टी 20 मालिकेला सुरुवात होणार आहे. भारतीय संघाने कसोटी आणि वनडे मालिका खिशात घातली आहे. आता टी20 मध्ये यजमान वेस्ट इंडिज युवा भारतीय संघाचा कसा सामना करणार ? हे पाहणं औत्सुक्याचे ठरणार आहे.
पुढील वर्षी जूनमध्ये टी 20 विश्वचषक होणार आहे. त्याआधी भारतीय संघाची बांधणी सुरु झाली आहे. अनुभवी खेळाडूंना आराम देण्यात आलाय. तर यशस्वी जयस्वाल, तिलक वर्मा यासारख्या युवा खेळाडूंना संधी दिली आहे. दुसरीकडे वेस्ट इंडिजचा संघ अनुभवी दिसत आहे. टी 20 चे अनेक धुरंधर वेस्ट इंडिज संघात दिसत आहेत. त्रिनिदाद येथील ब्रायन लारा स्टेडिअमवर भारत आणि वेस्ट इंडिजचा संघ भिडणार आहेत.
टी २० मालिकेत भारतीय संघात सिनिअर खेळाडूंना आराम देण्यात आला आहे. रोहित शर्मा, विराट कोहली यासारखे सिनिअर खेळाडूंना आराम दिलाय. हार्दिक पांड्या नेतृत्व करणार आहे. वेस्ट इंडिजच्या संघात काही अनुभवी खेळाडूंना संधी देण्यात आली आहे. टी २० साठी वेस्ट इंडिजचे खेळाडू ओळखले जातात. त्यामुळे ही मालिका रंगतदार होण्याची शक्यता आहे.
टीम इंडिया आणि वेस्ट इंडिज यांच्यात आतापर्यंत 25 टी20 आंतरराष्ट्रीय सामने खेळवले गेले आहेत. ज्यामध्ये टीम इंडियानं 17 सामने जिंकले आहेत. तर वेस्ट इंडिजनं केवळ 7 सामने जिंकले आहेत. याव्यतिरिक्त एक सामना अनिर्णित राहिला आहे.