न्युट्रीशियनफिचर

वजन कमी करताय न …?, मग योग्य तोच सल्ला घ्या

डॉ. ईश्वरी जोशी नानोटी, एमडी होमिओपॅथिक मेडिसीन्स

निता किती जाड दिसतेस तू !! काही योगा वगैरे करत नाहीस का आणि काय पोट किती सुटले बघ तुझे !!
अग पण माझे वजन काही काढलेले नाही एखादा किलोने वाढले असेल तर आणि मला तसा काही फारसा त्रास पण नाही मी घरचे काम करू शकते सगळे व्यवस्थित चालले आहे. असे संभाषण आपण सगळीकडे ऐकतो आणि सुनीताला मैत्रिणी असे म्हटले की तिच्या डोक्यात लगेच प्रश्न उठतात लागते मी जाड तर नाही दिसत आहे माझे वजन खूप वाढले असेल का सुनीता लगेच आपल्या गुगल बाबाला आवाज देते आणि उपाय करायला सुरुवात करते.

लिंबू पाणी घेण्यापासून ते एक वेळ दोन वेळा जेवण कमी करणे अशा अनेक विविध प्रकार करून पाहते. दर दिवसाआड वजनाच्या काट्यावर उभी राहते पण काटा काही सरकत नाही. हे सगळे करण्यामध्ये इतका ताण आलेला असतो की चेहरा पार सुकून जातो सतेज दिसणारी सुनीता एकदम निस्तेज दिसायला लागते आणि काळजीच्या भोवर्‍यात गुरफटते.

अशा अनेक स्त्री-पुरुष माझ्याकडे येतात पण मित्र-मैत्रिणींनो हे समजायची गरज आहे की वजनाच्या काटा तुमचे स्वास्थ्य सुदृढता ठरवू शकत नाही. जर मुळात शरिरयष्टी तशी असल्यास तुम्ही एकदम बारीक होऊ शकत नाही. याचा अर्थ असा नाही की सगळ्यांचे वजन जास्त असावे; वजन हे नेहमी मर्यादितच असायला हवे पण त्यात अनेक घटकांचा समावेश होतो जसे की अनुवंशिकता, दिनचर्या, तुम्हाला एखादा असणारा आजार आणि ताणतणाव. यापैकी आपल्याला नक्की काय झाले हे समजून घेणे खूप गरजेचे आहे.

काही आजारांनी वजन वाढते आहे की आपल्या चुकीच्या जीवनशैलीमुळे वाढत आहे हे पहिले समजून घ्या. योग्य डॉक्टर, आहार तज्ञ आणि योगा तज्ञ यांच्याकडून समजून घेऊन मग तसे तुमच्या जीवनाचा भाग बनवा. म्हणतात ना अती तेथे माती; कोणत्याही गोष्टीचा अतिरेक तुमच्या शरीराला हानीकारक ठरू शकतो. वजन कमी करतांना नेहमी लक्षात ठेवा जर एका महिन्यात दोन किलो पेक्षा जास्त वजन कमी होत असल्यास तुमच्या शरीरास अपायकारक असू शकते.

शरीरातले पोषक घटक कमी होऊन थकवा जाणवू शकतो किंवा आजार सुद्धा होऊ शकतो. म्हणून डायटींग योग्य डॉक्टरांच्या सल्ल्यानेच करा.वजन कमी करताना ते हळूहळू कमी करणे गरजेचे त्यात आहाराचे योग्य प्रमाण ठेवणे आणि आपल्याला आजार आहे त्यानुसार त्यावर काम करणे खूप गरजेचे आहे. होमिओपॅथिक औषधी तुमच्या अनुवंशिकता असेल तर योग्य पद्धतीने काम करते आणि वजनाचा मागचे कारण शोधून त्याला ठीक करण्यास मदत करते.

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये