देश - विदेश

काय सांगता! ‘या’ देशात कंडोमचं एक पाकीट मिळतं तब्बल ‘इतक्या’ हजारांना!

नवी दिल्ली : सध्या तंत्रज्ञानामुळे अनेक गोष्टी सहज उपलब्ध झाल्या आहेत. गर्भधारणा टाळण्यासाठी वेगवेगळे उपाय उपलब्ध आहेत. त्यात गर्भनिरोधक गोळी असो किंवा सध्या बाजरात उपलब्ध असलेले कंडोम असो. काही देशांमध्ये गर्भपात करणं कायदयाने गुन्हा असल्याचं मानलं जात. तर काही देशांमध्ये गर्भपात करणाऱ्या कोणत्याच गोष्टी सहजासहजी उपलब्ध होत नाहीत.

तसाच एक देश आहे जिथे गर्भनिरोधक साधनांची किंमत इतर देशांच्या तुलनेत फारच अधिक आहे. तो देश म्हणजे व्हेनेझुएला जिथे गर्भपात करणं हे बेकायदेशीर असल्याच सांगितलं जात. त्या ठिकाणी एका कंडोमच्या पाकिटाची किंमत ६० हजार रुपये आहे. तरी देखील तेथील लोक गर्भनिरोधक साधनांचा वापर करत असतात. याचबरोबर त्या ठिकाणी अशा गर्भनिरोधक साधनांचा तुटवडा निर्माण झालेला देखील पहायला मिळतो. याचप्रमाणे व्हेनेझुएला या देशात कंडोम सहज उपलब्ध न झाल्यामुळे एचआयव्ही रुग्णांची संख्याही देखील फार मोठी आहे.

दरम्यान, २०१५ संयुक्त राष्ट्रांच्या जागतिक लोकसंख्या अहवालानुसार व्हेनेझुएला या देशात सर्वात जास्त अल्पवयीन मुली गरोदर राहण्याचं प्रमाण होत. यामुळे या देशात जर अशीच परिस्थिती राहिली तर देशामधील एचआयव्हीबाधितांची संख्या वाढण्याची भीतीही व्यक्त केली जात आहे. याचबरोबर गर्भनिरोधक गोळ्या आणि कंडोम औषधांच्या दुकानांमध्ये आणि सुपरमार्केट्समध्ये लवकर उपलब्ध होत नाहीत. यामुळे त्या वस्तू काळ्या बाजारमध्ये विकल्या जात आहेत म्हणून त्याची किंमत तिपटीने वाढली आहे.

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये