काय आहे मंकीपॉक्स व्हायरस? ज्याला संपूर्ण जग घाबरत आहे
कोरोना संपतो न संपतोच तर हा मंकीपॉक्स नावाचा नवीन व्हायरस जगभरातील लोकांना भीती दाखवत आहे. रोगावर अजून कसला उपाय नसल्याने हा व्हायरसही कोरोनाप्रमाणेच विस्तारतो कि काय अशी वाटत आहे. सध्या जगभरातील सात ते आठ राष्ट्रांमध्ये या मंकीपॉक्स आजाराचे रुग्न समोर आले आहेत.
मंकीपॉक्स हा प्राण्यांमधून माणसांत येणार व्हायरस आहे. ज्याची लागण झाल्यांनतर सर्वसाधारणपणे सहा ते तेरा दिवसांत लक्षणे दिसायला लागतात. सर्दी, अशक्तपणा तीव्र डोकेदुखी, पाठदुखी स्नायू दुखणे अशी लक्षणे या रोगाची लागण झाल्यांनतर दिसतात. आणि मुख्य लक्षण म्हणजे सुरुवातीला स्माल पॉक्स किंवा कांजण्या यांसारख्या दिसतात मात्र थोड्याच दिवसांत त्या मोठ्या व्हायला आणि त्या जागची त्वचा फाटायला सुरु होते. या मंकीपॉक्स चेहरा, हाताचे तळवे, तळपाय, यांच्यावर जास्त प्रमाणात वाढते.
परंतु या रोगाबद्दल जास्त काळजी करण्याची आवश्यकता नसल्याचे डॉक्टर सांगता आहेत. बहुतेक रुग्ण काही आठवड्यांत बरे होतात. मंकीपॉक्सवर सध्या कोणताही विशिष्ट उपचार नाही. रुग्णांना चांगल्या रुग्णालयात राहावे लागेल जेणेकरून संसर्ग पसरू नये आणि सामान्य लक्षणांवर उपचार करता येतील.