देश - विदेश

तेजस ठाकरेंचा ‘तो’ वादग्रस्त व्हिडीओ व्हायरल, नितेश राणेंनी केले गंभीर आरोप

मुंबई | उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) गटाचे नेते आणि खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी भाजप नेते मोहित कंबोज (Mohit Kamboj) यांचा बारमधील व्हिडिओ शेअर करत विरोधकांना हिंदुत्वावरून चांगलाच टोला लगावला होता. त्यानंतर मोहित कंबोज यांनी पत्रकार परिषद घेत तेजस ठाकरे (Tejas Thackeray) यांचा एक व्हीडिओ दाखवला आणि एक बीलही. ज्यावर पेड बाय तेजस ठाकरे असं होतं तर बील तब्बल 97,000 चं. त्यावरून भाजप नेते आमदार नितेश राणे (Nitesh Rane) यांनी ठाकरे कुटुंबियांवर टीका केली आहे.

काय म्हणाले नितेश राणे?

“महाराष्ट्राच्या राजकारणात आग लावण्याचं काम संजय राऊत यांच्याकडून सुरु आहे. सामनातून पगार घ्यायचा आणि बोनसचा चेक शरद पवारांकडून घ्यायचा. शरद पवार यांनी मंगळवारी राष्ट्रवादीच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिला. त्यानंतर संजय राऊत यांना चिंता वाटू लागली की मी आता कुणाच्या बंगल्याबाहेर वॉचमनच्या शेजारी बसू?” असंही नितेश राणेंनी म्हटलं आहे.

संजय राऊत हा अत्यंत घाणेरडा माणूस, आगलाव्या माणूस आहे. संजय राऊत यांनी मुद्दाम रेडिओ बारचा विषय काढला. मोहित कंबोज यांना डिवचलं त्यामुळेच मोहित कंबोज यांनी तेसज ठाकरेंचा व्हिडीओच दाखवला. या व्हिडीओत तेसज ठाकरे दारु पिताना आणि मैत्रिणींसोबत पार्टी करतानाचा हा व्हिडीओ आहे.

काय आहे त्या व्हिडीओमध्ये?

या व्हिडीओत तेजस ठाकरे हे त्यांच्या मित्र मैत्रिणींसोबत ड्रींक्स करत असल्याचं दिसतं आहे. या हॉटेलचं बिलही ट्वीट करण्यात आलं आहे. हा व्हिडीओ कोव्हिड काळातला आहे असाही दावा करण्यात आला आहे.

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये