ताज्या बातम्या

‘व्हॅलेंटाइन डे’च्या दिवशी नवनीत राणांनी ‘लिव्ह इन’बद्दल केलं मोठं विधान

अमरावती | जगभरात व्हॅलेंटाइन डे साजरा केला जात आहे. सर्वांना आपला जोडीदार निवडण्याचा पूर्ण अधिकार आहे. अशातच अमरावतीच्या खासदार रवी राणा यांनी एक मोठं विधान केलं आहे. लिव्ह इन रिलेशनशिप काय असते कधी मी ऐकलं नव्हतं, मुलं-मुलांसोबत आणि मुली-मुलीनं सोबत लग्न करत आहे, ही कुठली परंपरा, आपल्या संस्कृतीमध्ये कुठून आलं, असं वक्तव्य अमरावतीत खासदार नवनीत राणां यांनी केलं आहे.

पुढे नवनीत राणा म्हणतात, ‘मी सुद्धा याच पिढीची आहे. लिव्ह इन रिलेशनशिप हे कधी ऐकलं नाही. आई-वडिल मुलांना शिक्षणासाठी पाठवतात आणि मुलं-मुली एकत्र राहतात. मुलं-मुलासोबत लग्न करत आहे आणि मुली-मुलींसोबत लग्न करत आहे. ‘मी सोशल मीडियावर पाहते, मला हे कुठे तरी दुखत आहे. ही गोष्ट कुठून आली ?

आपल्या मोठं करण्यासाठी आई-वडिलांनी हाडाचं पाणी केलं. आई-वडिलांनी आपले कर्तव्य पार पाडले. आई वडील मुला-मुलींना शिक्षणासाठी पाठवतात मात्र ते भाड्याच्या घरात लिव्ह इन मध्ये राहतात. आता समाज म्हणून आपण काय करतो, समाजाने आपल्याला नाव दिले आहे, त्यामुळे समाजाला काही तरी दिले पाहिजे असा आवाहन देखील केलं आहे.

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये