वाढता वाढता वाढे.. ताटातल्या चपातीची किंमत वाढली, एका वर्षात पिठाचे दर 40 टक्क्यांनी वाढ

Wheat Flour Price Hike : भारतात गव्हाच्या पिठाची किंमत दिवसेंदिवस वाढताना दिसत आहे. मागील एका वर्षामध्ये तुम्हाला माहितही होवू न देता, पिठाची किंमत 40 टक्क्यांनी वाढली आहे. सध्या पीठ 38 रुपये प्रतिकिलो रुपयाने विकले जात आहे, तर पॅकेजिंगमधील पीठ 45-55 रुपये प्रतिकिलो आहे. निर्यातीवर बंदी असतानाही गहू आणि पिठाच्या वाढत्या किमतींमुळे केंद्र सरकारवर तणाव वाढला आहे. त्यामुळे आपल्या ताटातल्या चपातीची किंमत वर्षभरात जवळपास 50% ने वाढली आहे.
भारत जगभरात गहू उत्पादनामध्ये दुसऱ्या क्रमांकांवर आहे, असे असले तरी देशात पिठाचा दर वाढत आहे. महागाईही वाढत आहे. गव्हाच्या किंमतीमध्ये वाढ झाली आहे. मैदा आणि रव्याचे भावही झपाट्याने वाढत आहेत, त्यामुळे सर्वसामान्यांचे स्वयंपाकघराचे बजेट बिघडले आहे. गव्हाच्या किमतीत वाढ झाल्यानंतर अनेक राज्यांमध्ये गहू दिला जात नाही किंवा कमीही मिळत आहे.
गव्हाच्या सरकारी खरेदीत झालेली घट ही पिठाच्या किंमती वाढण्यामागचे दुसरे कारण आहे. 2020-21 मध्ये, भारतीय सरकारी संस्थांनी 43.3 दशलक्ष टन गहू खरेदी केला होता. 2021-22 मध्ये हा आकडा 18 दशलक्ष टनांच्या जवळपास पोहोचला. म्हणजे हा आकडा निम्म्याहून खाली घसरला. कृषि तज्ज्ञ परमजीत सिंह यांनी सांगितले की, केंद्र सरकारने गव्हासाठी सुमारे 23 रुपये आधारभूत किंमत ठेवली होती, पण व्यापाऱ्यांनी 25-26 रुपये देऊन लोकांकडून गहू खरेदी करुन त्याची साठवण केली आणि ते बाजारात आला नाही त्यामुळे भाववाढ दिवसेंदिवस वाढत आहे.