जसप्रीत बुमरा खेळणार की नाही, बीसीसीआयने केली स्पष्ट भूमिका!
मुंबई : वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहला आयसीसी टी-20 विश्वचषक खेळणार की नाही, यावर अनेक क्रिकेट प्रेमींमध्ये संभ्रम निर्माण झाला होता. सोमवारी दि. 03 रोजी भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) या विकासाची पुष्टी करण्यासाठी अधिकृत निवेदन जारी केले.
बीसीसीआय वैद्यकीय संघाने टीम इंडियाचा वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहला आयसीसी पुरुषांच्या T20 विश्वचषक संघातून वगळले आहे. यामध्ये सर्वानुमते आयसीसी टी-20 विश्वचषकात जसप्रीत बुमराहला भारतीय संघातून बाहेर काढण्यात आलं असल्याची निवेदनाद्वारे अधिकृत माहिती देण्यात आली आहे. तपशीलवार मूल्यांकन आणि तज्ञांशी सल्लामसलत केल्यानंतर हा निर्णय घेण्यात आला असल्याचे सांगण्यात आलं आहे.
बुमराहला सुरुवातीला पाठीच्या दुखापतीमुळे दक्षिण आफ्रिकेविरुद्ध सुरू असलेल्या 3 सामन्यांच्या T20I मालिकेतून वगळण्यात आले होते. त्यानंतर हा भारतीय क्रिकेट बोर्डाने मोठा निर्णय घेतला आहे.