ताज्या बातम्यामहाराष्ट्र

महावितरण कर्मचाऱ्यांच्या संपामुळे वीजपुरवठा विस्कळीत होणार? MSEB संचालकांचं स्पष्टीकरण; म्हणाले…

मुंबई | Mahavitaran Strike – आजपासून (4 डिसेंबर) महावितरणचे (Mahavitaran) अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या (Employees) संपाला (Strike) सुरूवात झाली आहे. महावितरणच्या कर्मचाऱ्यांनी खासगीकरणाला (Privatization) विरोध करण्यासाठी संपाची हाक दिली आहे. त्यामुळं काही भागांमध्ये वीज पुरवठा बंद झाल्यानं अडचणी निर्माण झाल्या आहेत. तसंच तीन दिवस राज्यातील वीजपुरवठा विस्कळीत होण्याची भीती आहे. या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र राज्य वीज मंडळाचे (MSEB) संचालक विश्वास पाठक (Vishwas Pathak) यांनी यासंदर्भात स्पष्टीकरण दिलं आहे. राज्यातील जनतेला कुठेही भयभीत होण्याची आवश्यकता नसल्याचं त्यांनी म्हटलं आहे.

विश्वास पाठक यांनी ट्विट करत म्हटलं आहे की, “राज्यातील जनतेनं कुठेही भयभीत होण्याची आवश्यकता नाही. वीज कर्मचारी त्यांच्या संपाविषयीची भूमिका बदलतील याची खात्री आहे. अन्यथा पर्यायी व्यवस्था झाली असल्यानं विद्युत पुरवठा अखंडित राहील याची खात्री बाळगावी.”

जाणून घ्या नेमकं प्रकरण काय?

महावितरणच्या भांडुप कार्यक्षेत्रातील काही भागांमध्ये वीज वितरण परवाना मिळविण्यासाठी अदानी वीज कंपनीनं राज्य वीज नियामक आयोगाकडे अर्ज केला आहे. राज्य सरकार अदानी कंपनीला वीज वितरण परवाना मिळण्याबाबत सकारात्मक आहे. मात्र, महावितरण कंपनीला चांगले उत्पन्न मिळत असलेली किंवा वीजबिल वसुलीचे प्रमाण चांगले असलेले विभाग खासगी वीज कंपनीकडे जातील आणि महावितरण कंपनी आणखी आर्थिक अडचणीत सापडून शासकीय वीजकंपन्यांचं खासगीकरण होईल, अशी भीती आहे. त्यामुळे महावितरण कंपनीतील 30 कर्मचारी, कामगार संघटनांनी संप पुकारला आहे. तसंच हा संप तीन दिवस सुरू राहणार आहे.

या संपाच्या पार्श्वभूमीवर विविध परिमंडळामध्ये सुरळीत वीजपुरवठ्यासाठी विविध उपाययोजनांसह विभाग, मंडळ व परिमंडळ स्तरावर 24 तास सुरू राहणारे नियंत्रण कक्ष सुरू करण्यात आले आहेत. तसंच संपात सहभागी नसलेले महावितरणचे कर्मचारी, बाह्यस्रोत कर्मचारी, महावितरणचे ॲप्रेंटिस, विद्युत सहायक, प्रशिक्षणार्थी अभियंता, देखभाल आणि दुरुस्ती करणाऱ्या निवड सूचीवरील कंत्राटदारांचे कर्मचारी यांच्या सुरळीत वीजपुरवठ्यासाठी स्थानिक कार्यालय, उपकेंद्र आदी ठिकाणी तात्पुरत्या नियुक्ती करण्यात आल्या आहेत.

Related Articles

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये