क्रीडाताज्या बातम्यादेश - विदेश

धक्कादायक! ‘या’ कारणामुळे विराट कोहलीला होणार अटक?, #ArrestKohli व्हायरल

नवी दिल्ली | Virat Kohli – सध्या भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार विरोट कोहलीला (Virat Kohli) अटक करण्याची मागणी नेटकऱ्यांकडून केली जात आहे. त्यामुळे सगळीकडे चर्चांना उधाण आलं आहे. #ArrestKohli हा हॅशटॅग ट्विटरवर मोठ्या प्रमाणात ट्रेन्ड होत आहे. याला तामिळनाडूच्या अरियालुर जिल्ह्यात घडलेली एक घटना कारणीभूत आहे. तामिळनाडूतील एका 24 वर्षीय मुलानं कोहली आणि आरसीबी संघाबद्दल अपशब्द वापरल्यानं त्याच्याच 21 वर्षीय मित्रानं त्याचा खून केल्याची धक्कादायक घटना घडली आहे.

तामिळनाडू येथील लोकल मीडियाने दिलेल्या माहितीनुसार, 11 ऑक्टोबर रोजी दोन मित्र अरियालूर जिल्ह्यातील मल्लूर येथील सिडको इंडस्ट्रीयल इस्टेट येथे गेले होते. दोघेही मित्र दारू प्यायला बसल्यानंतर एकानं विराट कोहली आणि आयपीएल संघ राॅयल चॅलेंजर्स बंगळुरबाबत आपत्तीजनक शब्दांचा वापर केला. त्यानंतर त्याचा मित्र जो विराटचा फॅन आहे, त्याने थेट हाणामारी करण्यास सुरूवात केली आणि रागाच्या भरात मित्राचाच खून केला. तसंच मृत व्यक्तीचं नाव पी. विग्नेश (24 वर्षे) असं असून तो मुंबई इंडीयन्स संघाचा फॅन होता. तर आरोपीचं नाव ए. धर्मराज (21 वर्षे) असून तो आरसीबी फॅन असल्याचं समोर आलं आहे. त्यामुळे या संपूर्ण घटनेची स्थानिक पोलीस कसून चौकशी करत आहेत.

दरम्यान, क्रिकेट हा सर्वात लोकप्रिय खेळ असून क्रिकेटर्सला अगदी डोक्यावर घेतलं जातं. त्यात क्रिकेटर्सची क्रेझ खासकरून तरूणाईत खूप असल्याचं दिसून येत. फॅन्स आपल्या आवडत्या खेळाडू, संघाबाबत कमालीचे भावनिक होत असल्याचं दिसून आलं आहे. यातूनच तामिळनाडू येथे एक भयानक घटना घडली. ज्यामध्ये विरोट कोहलीबाबत अपशब्द काढले म्हणून एकाने आपल्याच मित्राची निघृण हत्या केल्याचं समोर आलं आहे. तसंच या संपूर्ण प्रकरणाची सोशल मीडियावर जोरदार चर्चा सुरू असून #ArrestKohli हा हॅशटॅग ट्रेन्ड होताना दिसत आहे.

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये