ताज्या बातम्यादेश - विदेश

कोरोनाची भीती बाळगून महिलेनं मुलासह स्वत:ला ३ वर्षे घेतलं कोंडून; जाणून घ्या संपूर्ण प्रकार

गुरूग्राम | कोरोनामुळे दोन वर्ष सर्वत्र भीतीचे वातावरण पसरले होते. वातावरण निवळल्यानंतर सुद्धा लोकांना घराबाहेर पडण्याची भीती वाटत होती. याचं भयंकर असं उदाहरण गुरुग्राममधून समोर आलं आहे. संसर्गाच्या भीतीने एका महिलेच्या मनात इतकी भीती बसली की तिने आपल्या दहा वर्षाच्या मुलासह स्वत:ला तीन वर्षे घरात कोंडून घेतलं.

पती पती सुजान माजी हा भाड्याच्या घरात वेगळा राहात होता. पत्नी मुनमुन माजीच्या सांगण्यानुसार साहित्य फ्लॅटच्या पायऱ्यांवर ठेवायचा. आई आणि मुलगा साबणाने धुतल्यानंतर फळांसारख्या गोष्टी खायचे. मुलगा तीन वर्षांपासून घरातून ऑनलाइन शिक्षण घेत होता. मात्र पतीने याविरोधात तक्रार दाखल केल्यानंतर अखेर मंगळवारी रात्री उशिरा पोलिसांनी घराचा दरवाजा तोडून महिलेसह मुलाला बाहेर काढलं.

बुधवारी सायंकाळी गुरुग्रामच्या न्यायालयासमोर जबाबात महिलेनं म्हटलं की, मुलाने लस घेतल्यानंतरच त्यानं बाहेर पडावं असं वाटतं होतं. तर पतीने म्हटलं की, पत्नीला अनेकदा समजावलं की कोरोना आता तितका राहिलेला नाही तरी ती मान्य करण्यास तयार नव्हती. डॉक्टरांनी मुनमुन माजी यांना मानसिक आजार असल्याचं म्हटलंय.

तीन वर्षांपूर्वी 2020 मध्ये कोरोनाच्या सुरुवातीला तिचा मुलगा सात वर्षांचा होता, आता तो दहा वर्षांचा झाला आहे. यावेळी अनेकदा पतीने दोघांना बाहेर काढण्याचा प्रयत्न केला. पण महिलेनं मुलाला लस घेतल्याशिवाय बाहेर नाही येणार असं म्हटलं. महिलेनं पतीलासुद्धा आत येऊ दिलं नव्हतं. पती ऑफिसला जातो, त्यामुळे कोरोनाचा धोका असल्याचं तिने सांगितलं.

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये