सिटी अपडेट्स

WOW…पहिली इलेक्ट्रिक एसटी १ जूनपासून!

पुणे : राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या १ जूनला होणार्‍या वर्धापनदिनानिमित्त राज्यात पहिली इलेक्ट्रिक एसटी धावणार असल्याची घोषणा केली आहे. दरम्यान, राज्यात पहिली एसटी बस पुणे- अहमदनगर मार्गावर धावली होती. त्याच मार्गावरून आता ही पहिली इलेक्ट्रिक एसटी बस चालवली जाणार आहे. शिवाई या नावाने ही बस चालवण्याचे नियोजन एसटी महामंडळाने केले आहे. गाड्यांचा तुटवडा कमी करण्यासाठी वर्षाखेरीस ३ हजार पर्यावरणपूरक गाड्या एसटी महामंडळात दाखल होणार आहेत.

देशातील सार्वजनिक प्रवासी वाहतुकीमध्ये पर्यावरणपूरक इलेक्ट्रिक गाड्यांचा समावेश वाढवण्यासाठी केंद्राने ’फेम’ ही योजना सुरू केली आहे. या योजनेनुसार इलेक्ट्रिक बससाठी केंद्राकडून विशेष सवलत देण्यात येते. केंद्राच्या योजनेअंतर्गत आता एसटी महामंडळाला एक हजार इलेक्ट्रिक बस आणि २ हजार सीएनजीवर चालणार्‍या बस मिळणार आहेत. यात पहिल्या टप्प्यात १५० इलेक्ट्रिक बस जून महिन्यात दाखल होतील, तर वर्षाअखेर एकूण १ हजार बस दाखल होतील.

शहरात मुबलक प्रमाणात उपलब्ध असलेला सीएनजीचा साठा पाहता मुंबई-पुणे-नाशिक या भागात एसटीच्या बसेस सीएनजीवर चालणार्‍या असतील. ग्रामीण भागात डिझेलवर चालणार्‍या एसटी सुरु राहणार असल्याचे सांगण्यात
आले आहे.

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये