इतरक्रीडाताज्या बातम्यादेश - विदेशमहाराष्ट्र

गुन्हा दाखल झाल्यानंतर ब्रिजभूषण यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “मी या आरोपांना…”

नवी दिल्ली | Wrestlers Protest – भारताच्या महिला कुस्तीपटूंनी रेसलिंग फेडरेशन ऑफ इंडियाचे (WFI) अध्यक्ष ब्रिजभूषण शरण सिंह (Brij Bhushan Sharan Singh) यांच्याविरोधात दिल्लीत आंदोलन पुकारलं आहे. कुस्तीपटूंनी ब्रिजभूषण शरण सिंह यांच्यावर लैंगिक शोषणाचे गंभीर आरोप केले आहेत. तसंच या प्रकरणी त्यांच्यावर कारवाई करण्याची मागणी देखील कुस्तीपटूंनी केली होती. अखेर कस्तीपटूंच्या या मागणीला यश आलं आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या मध्यस्तीनंतर आता ब्रिजभूषण सिंह यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

ब्रिजभूषण सिंह यांच्यावर गुन्हा दाखल झाल्यानंतर त्यांनी पहिली प्रतिक्रिया दिली आहे. यावेळी ते म्हणाले की, “मी निर्दोष असून तपासाला सामोरे जाण्यास तयार आहे. तपास यंत्रणेला मी पुर्ण सहकार्य करायला तयार आहे. न्यायव्यवस्थेवर माझा पूर्ण विश्वास आहे. तसंच सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाचा मी आदर करतो.”

“सध्या एफआयआरची प्रत माझ्याकडे नाहीये. पण जर एफआयआर झालीच असेल तर मला त्यात काहीही गैर दिसत नाही. दिल्ली पोलिसांवर माझा पूर्ण विश्वास आहे. मी पूर्णपणे निर्दोष असून मी या आरोपांना सामोरं जाण्यास तयार आहे”, असंही ब्रिजभूषण सिंह म्हणाले.

या आंदोलनामागे काँग्रेसचा हात असल्याचा आरोपही ब्रिजभूषण सिंह यांनी केला आहे. तसंच एफआयआर दाखल करण्याबाबत चर्चा झाली असल्याचंही ब्रिजभूषण यांनी सांगितलं.

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये