WWE सुपरस्टार्स ‘नाटू नाटू’ गाण्यावर जबरदस्त थिरकले, व्हिडिओ होतोय व्हायरल…

हैदराबादमध्ये गेल्या आठवड्यात वर्ल्ड रेसलिंग एंटरटेनमेंट (WWE) चे यशस्वी आयोजन करण्यात आले होते. ड्र्यू मॅकइन्टायर, जिंदर महल, सामी झेन आणि केविन ओवेन्ससारखे सुपरस्टार रेसलर रिंगमध्ये लढले. WWE रिंगमध्ये आपल्या आवडत्या कुस्तीपटूंना पाहण्यासाठी भारतीय चाहत्यांनी जबरदस्त गर्दी केली होती.
यावेळी रेसलरनी आरआरआर या ऑस्कर विजेत्या चित्रपटातील नाटू-नाटू या गाण्यावर डान्स केला. यामुळे चाहत्यांचा उत्साह अधिकच वाढला. रेसलरच्या डान्सचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
WWE पाहताना भारतीय चाहत्यांसाठी खूप रोमांचक होते. या मेगा इव्हेंटमध्ये अॅक्शन, ड्रामा, अॅक्रोबॅटिक्स आणि जबरदस्त डान्स होता. रेसलिंग करण्याबरोबर WWE स्पर्धकांनी डान्सचा देखील आनंद घेतला. स्पर्धकांनी नाटू नाटू गाण्यावर ठेका धरल्यानंतर चाहते देखील थिरकले. यामुळे मोठा जल्लोष झाला होता.
रिंगमध्ये ड्र्यू मॅकइन्टायर, जिंदर महल, सामी झेन आणि केविन ओवेन्स सारख्या सुपरस्टार्सना नाचताना पाहणे हे प्रेक्षकांसाठी एक दुर्मिळ आणि आनंददायी दृश्य होते. कुस्तीपटूंचा डान्स करतानाचा हा व्हिडिओ व्हायरल झाला आहे.