क्रिकेटसाठी घर सोडलं, पाणीपुरी विकली; जायस्वालची ‘यशस्वी’ कहाणी खरी? वाचा सविस्तर..

Yashasvi Jaiswal Journey : यशस्वी जायस्वालने (Yashavi Jaiswal) नुकतंच वेस्ट इंडिज विरोधात कसोटी (India vs West Indies) सामन्यातून आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केलं. आपल्या पहिल्याच कसोटीत त्याने शतक ठोकून आपल्या नावावर विक्रमाची नोंद केली. दुसऱ्या कसोटीतही त्याने अर्धशतकी खेळी रचली. आयपीएल 2023 मध्ये त्याने चांगली कामगिरी केली. त्याआधीच्या आयपीएलमध्येही त्याने चांगली कामगिरी केली होती. त्यामुळे सध्या तो चांगलाच चर्चेत येताना दिसत आहे.
आयपीएल आणि भारतीय संघापर्यंतचा त्याचा प्रवास अतिशय संघर्षाचा होता. सोशल मीडियावर त्याचे अनेक फोटो देखील व्हायरल झाले होते, ज्यात तो आपल्या वडिलांसह पाणीपुरी विकताना दिसत होता. यशस्वीने सुख आणि सुविधांसह इथपर्यंतचा प्रवास केल्याचा दावा यशस्वीचे प्रशिक्षक ज्वाला सिंह यांनी केला आहे. शिवाय त्याने कधीही पाणीपुरी विकली नाही, असं त्यांनी म्हटलं
पुढे बोलताना प्रशिक्षक सिंह म्हणाले की, “लोक म्हणतात की यशस्वी जायस्वाल पाणीपुरी विकत होता आणि संघर्ष करत इथपर्यंत पोहोचला. यात काहीसं तथ्य नक्की आहे. त्याने आयुष्यात कधीच पाणीपुरी विकली नाही. ही गोष्ट वारंवार शेअर केली जाते आणि त्यामुळे हेडलाईन बनते. पण यात केवळ पाच टक्केच तथ्य असावं. या गोष्टीचं जायस्वाल आणि मला फारच वाईट वाटतंय की मीडिया असं सांगते की जायस्वाल फक्त पाणीपुरी विकायचा.