ताज्या बातम्या

अपोझिट सेक्सच आकर्षण असतं, बाकी प्रेमबीम काही नसतं; भाजप मंत्र्यांचं विद्यार्थ्यांसमोरच वादग्रस्त विधान

लखनऊ | ‘बेटी बचाओ, बेटी पढ़ाओ’ मोहिमेअंतर्गत इटावा येथे राष्ट्रीय बालिका दिवस कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. यावेळी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना योगी आदित्यनाथ (Yogi Adityanath) सरकारमधील मंत्री प्रतिभा शुक्ला (Pratibha Shukla) यांनी वादग्रस्त विधान केले आहे. प्रेमबीम काही नसतं, केवळ सेक्सचं आकर्षण असतं असं धक्कादायक विधान प्रतिभा शुक्ला (Pratibha Shukla) यांनी केले आहे.

पुढे बोलताना त्या असही म्हणाल्या की, मुले असो वा मुली दोघांनाही सुधारण्याची गरज आहे. जोपर्यंत तुम्ही तुमचं लक्ष्य गाठत नाही, तोपर्यंत या भानगडीत पडू नका. मुली नटून सजून घरातून निघाल्या तर समजून जा काही तरी गडबड आहे. त्यांना सांभाळण्याची गरज आहे, अशा सूचनाही शुक्ला (Pratibha Shukla) यांनी केल्या. मात्र, शुक्ला यांनी विद्यार्थ्यांसमोरच ही धक्कादायक विधाने केल्याने एकच खळबळ उडाली आहे.

त्यांनी विद्यार्थ्यांना अभ्यासावरच लक्ष्य केंद्रीत करण्यास सांगितलं आहे. मुलांनी प्रेमा बीमाच्या भानगडीत पडू नये. त्यांनी आपल्या शिक्षणावर लक्ष द्यावं. प्रेम बीम काही नसतं. ते केवळ अपोझिट सेक्सचं आकर्षण असतं. त्यापासून दूर राहण्याची गरज आहे, असं प्रतिभा शुक्ला म्हणाल्या.

आयांनो तुमच्या मुलांवर लक्ष ठेवा

मुलांच्या वाढत्या वयाबरोबर आईवडिलांची जबाबदारीही वाढते. मुलं मुली कुठे जात आहेत, याकडे लक्ष ठेवलं पाहिजे. मुलं मुली कुणाला भेटत आहेत. का भेटत आहेत यावरही लक्ष दिलं पाहिजे. मुलींनीही आपल्या आईला मैत्रीण समजून आईशी चर्चा करावी. आयांनीही मुलींच्या समस्यांवर तात्काळ मार्ग काढला पाहिजे. जर तुमच्या मुलाचा खर्च वाढू लागला असेल तर समजून जा हे चांगले संकेत नाहीत. अशा गोष्टीमुळे गडबड वाढण्याचे चान्सेस अधिक आहेत, असंही त्या म्हणाल्या.

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये