ताज्या बातम्यादेश - विदेशमहाराष्ट्ररणधुमाळी

“अहिल्यादेवींनी जे केलं तेच तुमचा आमदार करतोय”; शरद पवार

Ahamadnagar – Ahilyadevi Holakar Birth Anniversary | आज देशभर पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंतीनिमित्त राष्ट्रवादी कॉंग्रेसचे आमदार रोहित पवार (Rohit Pawar NCP) यांनी चौंडीमध्ये आयोजित केलेल्या कार्यक्रमात राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) आणि इतर नेते उपस्थित होते. यावेळी शरद पवार यांनी नातू रोहित पवार यांचे तोंड भरून कौतुक केले.

कार्यक्रमात बोलताना शरद पवार म्हणाले, ‘अहिल्यादेवी होळकर यांचे स्मरण करताना इथे उद्योग आणण्यासाठी रोहित सतत प्रयत्न करतोय. येणाऱ्या काळात तुमचा पाणी प्रश्न, रोजगाराचा प्रश्न रस्त्यांचा प्रश्न सुटणार आहे. अ हल्यादेवी होळकरांनी जे केलं तेच तुमचा आमदार करतोय.’ असं तोंड भरून कौतुक शरद पवार यांनी यावेळी केलं.

पुढे शरद पवार म्हणाले, राजमाता जिजाऊ, सावित्रीबाई फुले आणि अहिल्यादेवी होळकर यांनी समाज सुधारण्यासाठी प्रयत्न केले. प्रशासन कसे चालवावे हे त्यांनी आपल्या कर्तुत्वातून दाखवून दिले. त्यामुळे हा दिवस स्त्रियांचा सन्मान करण्याचा दिवस आहे. एकेकाळी या भागात मोठा दुष्काळ होता. तुम्ही रोहितला निवडून दिल्यानंतर त्याने केलेली कामं दिसून येत आहेत. याचा मला अभिमान वाटतो.’ असंही पवार यावेळी म्हणाले.

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये