पिंपरी चिंचवडराष्ट्रसंचार कनेक्टसिटी अपडेट्स

सामाजिक कार्यकर्त्या शीतल वर्णेकर यांचा पुढाकार

हिराबाई लांडगे यांच्या स्मरणार्थ मोफत रुग्णवाहिका लोकार्पण

पिंपरी : सामाजिक- राजकीय क्षेत्रात काम करणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला प्रेरणा मिळेल, असा आदर्श सामाजिक कार्यकर्त्या शीतल वर्णेकर यांनी आपल्या कृतीतून घालून दिला आहे. आपल्या वाढदिनी सामाजिक बांधिलकी जप्त रुपीनगर- तळवडे परिसरातील नागरिकांसाठी रुग्णवाहिकचे लोकार्पण करण्यात आले. या उपक्रमाचे सर्वसामान्य नागरिकांमधून कौतूक होत आहे.

विशेष म्हणजे, भाजपाचे शहराध्यक्ष व आमदार महेश लांडगे यांच्या मातोश्री कै. सौ. हिराबाई लांडगे यांना देवाज्ञा झाली. या दु:खात सहभागी होत भाजपा महिला आघाडीच्या शहर उपाध्यक्षा असलेल्या शीतल वर्णेकर यांनी आपल्या वाढदिनी असलेले विविध कार्यक्रम रद्द केले. तसेच, ‘‘आईचे प्रेम अगणित आहे. आईचे महत्त्व आपल्या जीवनामध्ये खूप आहे. आपला प्रत्येक दिवस आईमुळे असतो. आमदार लांडगे यांची आई माझ्या आई समान आहे. त्यांचे दु:ख हे माझे दु:ख आहे.’’ अशी भूमिका ठेवत कोणत्याही प्रकारचा कार्यक्रम साजरा करणार नाही, असा संकल्प वर्णेकर यांनी केला आहे.

दरम्यान, कै. सौ. हिराबाई किसनराव लांडगे यांच्या स्मरणार्थ सामाजिक उपक्रमाअंतर्गत प्रभागातील नागरिकांच्या आरोग्यासाठी नेहमीच गरज असलेली वैद्यकीय सेवा म्हणजेच मोफत रुग्णवाहिका सेवा लोकार्पण सोहळा दसऱ्याच्या शुभमुहूर्तावर आयोजित करण्यात आला. त्यामुळे अनेक गरजू व्यक्तीसाठी सदर रुग्णवाहिका सेवा उपलब्ध झाली आहे. यावेळी आमदार महेश लांडगे, उद्योजक रोहिदास गाडे, माजी नगरसेवक शांताराम बापू भालेकर, माजी स्वीकृत नगरसेवक पांडुरंग भालेकर, डॉ. धनंजय वर्णेकर, ज्ञानदीप संस्थेचे अध्यक्ष एस. डी. भालेकर, उद्योजक गंगा भालेकर, युवा नेते शरद भालेकर, विशाल मानकरी, दादासाहेब नरळे, सर्जेराव कचरे, नितीन शिंदे, सुजाता काटे, अक्षय तांबे सुबोध साळवे, श्रेयस भालेकर, शिवाजी वायकुळे, भाऊसाहेब काळोखे, अभिजीत गिरी दिग्विजय सवई, हर्षल भंडारी, ज्ञानदीप शिक्षण प्रसारक संस्थेचे रमेश भालेकर, युवा नेते शिरीष उतेकर, दादा सातपुते, रामदास कुटे, अनिल भालेकर, सोमनाथ मेमाणे आदी उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये