अग्निशामक दलातील जवानांमुळे प्राण वाचले

पुणे ः अग्निशमन दलाचे जवान लवकरच कात्रज येथे लागलेल्या भीषण आगीच्या ठिकाणी आल्याने मोठ्या २५ व लहान सिलिंडरच्या १४० टाक्या जागेवर त्वरित स्थलांतरित करून मंदिराच्या जवळून पाणीमारा केल्याने मोठी दुर्घटना व जीवितहीनी झाली नाही.
मागील तीन वर्षांपासून दत्तात्रय काळे यांच्या मालकीच्या जमिनीवर सागर पाटील यांने गॅस व्यवसाय विनापरवाना शेड बांधून सुरू केला होता. त्याने या शेडमध्ये सिलिंडरच्या टाक्या साठवून ठेवलेल्या होत्या.१५ किलो गॅसच्या मोठ्या टाकीतून छोट्या ३/५ किलोचे सिलिंडर भरून देत होता. ज्या दिवशी स्फोट झाला त्यावेळेस छोट्या टाक्यांत गॅस भरताना स्फोट झाला. यामध्ये छोट्या २२ टाक्या, बांधलेले पत्राशेड, एक चारचाकी छोटी हत्ती (टेम्पो)चे नुकसान झाले आहे.
याआधीही भारती विद्यापीठ पोलिसांनी कारवाई केली होती. पण परत २० दिवसांनी पुन्हा व्यवसाय सुरू केला. या भागात अनधिकृत घरे, व्यवसाय व धंदे चालतात. घटनास्थळी महानगरपालिका अधिकार्यांनी या जागेवर नोटीस लावली. भारती विद्यापीठ पोलिस ठाण्यातील मुख्य निरीक्षक व पुणे पोलिस मुख्यालयतील मुख्य अधिकारी पाहणी करून याचा लवकरात शोध घेऊन त्यांना व्यवसायाकरिता गॅस पुरवठा करणार्यांवर कारवाई केली जाईल. यामध्ये जागेच्या मालकासहित आणखी दोघांवर तक्रार दाखल करण्यात आली आहे.