उद्धव ठाकरेच माझ्या विरोधातील कटाचे मास्टरमाईंड : किरिट सोमय्या
मुंबई : आयएनएस विक्रांत निधी घोटाळा प्रकरणी गुन्हा दाखल झाल्यानंतर भाजप नेते किरिट सोमय्या माध्यमापासून काही दिवस दुर होते. पण मुंबई हायकोर्टानं त्यांना अटकेपासून संरक्षण दिल्यानंतर ते बुधवारी माध्यमांसमोर आले. न्यायालयाच्या निकालानंतरच आपण समोर आल्याचे यावेळी सोमय्यांनी सांगितले. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हेच आपल्याविरोधातील कटाचा मास्टरमाईंड असल्याचा गंभीर आरोप देखील सोमय्यांनी यावेळी केला.
मी शांत बसेल असे या सरकारला वाटते, पण मी महाविकास आघाडी सरकारचा आणखी एक घोटाळा उघडकीस आणणार असल्याचा इशारा भाजप नेते किरीट सोमय्या यांनी दिला. उद्या आपण मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या कुटुंबातील आणखी एका व्यक्तीचा घोटाळा उघड करणार असल्याचे त्यांनी सांगितले. मुख्यमंत्र्यांच्या मेव्हण्याची मालमत्ता जप्त झाली, त्यानंतरही उद्धव ठाकरे गप्प का ? असा प्रश्नदेखील सोमय्या यांनी यावेळी उपस्थित केला.
यावेळी सोमय्या म्हणाले की, एक डजन लोकांची प्रॉपर्टी ई़डीने अटॅच केली आहे. असे सांगत अनिल देशमुख, श्रीधर पाटणकर, नवाब मलिकांसहीत संजय राऊत, यशवंत जाधव, अजित पवार, हसन मुश्रीफ, सदानंद कदम, अडसुळ आदींची संपत्ती अटॅच झाल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. १९९७ – ९८ पासून विक्रांतची मोहीम सुरू झाली असून, या प्रकरणात स्वतः आणि माझे वकील कोर्टात सगळी माहिती देत असल्याचे सोमय्यांनी यावेळी स्पष्ट केलं.