उद्धव ठाकरेंचा शिंदे गटावर हल्लाबोल, म्हणाले; “ज्यांचं भविष्य दिल्लीश्वरांच्या होतात आहे ते…”,

बुलढाणा : (Uddhav Thackeray On Eknath Shinde) शनिवार दि. 26 नोव्हेंबर रोजी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी बुलढाण्यातील चिखली येथे शेतकरी संवाद मेळावा आयोजिक केला होता. यावेळी त्यांनी शिंदे गटावर जोरदार हल्ला चढवला. ते म्हणाले, मराठी मातीतील गद्दारी याच मातीत गाडण्यासाठी या जिजाऊंच्या जन्मभूमीत सभा घेतल्याचं मत त्यांनी व्यक्त केलं आहे.
दरम्यान पुढे ठाकरे म्हणाले, दसरा मेळाव्याच ठरवले होतं मुंबई बाहेर माझी मुंबईच्या बाहेर जी पहिली सभा होईल ती जिजाऊंचे जन्मस्थान असलेल्या बुलढाण्यात घेईल. म्हणून मी जिजाऊंचे आशीर्वाद घेऊन पुढे निघालं पाहिजे, या विचाराने तुमच्या समोर आलो आहे.
“गेल्या आठवड्यात मुख्यमंत्री मिंधे यांनी ज्योतिषाला हात दाखवला, आज कामाख्या देवीच्या दर्शनासाठी ४० रेडे घेऊन ते गुवाहाटीला गेलेत हे मी नाही म्हणत, तर त्यांच्याच एका मंत्र्यांने सांगितलं. ज्यांना स्वत:चं भविष्य माहिती नाहीत, ते काय आपलं भविष्य घडवणार? त्यांचं भविष्य दिल्लीश्वरांच्या हातात आहे. उठ म्हटलं की उठायचं, बस म्हटलं की बसायचं.. असं हे सरकार आपल्याला हवं आहे का? ते गेलेत असतील गुवाहाटीला… पण मी माँ जिजाऊंच्या भूमीत मी तुमचा आशीर्वाद घेण्यासाठी आलोय. गद्दारीचं पीक गाडण्यासाठी माँ जिजाऊंच्या भूमीचा आशीर्वाद घेऊन जिंकणार म्हणजे जिंकणारच, असा एल्गार उद्धव ठाकरे यांनी केला.