
पुणे : () सहा महिन्यापुर्वी एकनाथ शिंदेंनी शिवसेनेसोबत बंडखोरी केली, भाजपसोबत हातमिळणी करत नवीन सरकार स्थापन केलं. तेव्हापासून कायदा आणि सुव्यवस्था बिघडवणारे अनेक प्रकरणे समोर येताना दिसत आहेत, असा सवाल विरोधक नेहमी करतात. त्यातच आता पुण्यातील वानवडीतील शिवसेना अल्पसंख्यांक सेलच्या जिल्हाध्यक्षांच्या कार्यालयावर टोळक्याकडून भर दिवसा गोळीबार केल्याचा प्रकार घडला आहे. शिवाय यावेळी यहा के भाई लागे हम है, हमारे नाद को लगे तो जान से हात धो बैठोगे, असं संदेश देत हा गोळीबार केली आहे. त्यामुळे कायद्याचा काही धाक या गुंडांवर राहिला आहे की, नाही असा सवाल यानिमित्ताने पुन्हा एकदा निर्माण झाला आहे.
हा हल्ला पुर्व वैमनस्यातून दहशत निर्माण करण्यासाठी स्वतःला भाई म्हणविणाऱ्याने हातत पिस्तुल घेऊन हवेत गोळीबार केल्याचा प्रकार घडला. मुख्य रस्त्यावरून बाईकवर जात असताना, पिस्तूलातून फायरिंग दहशत निर्माण केली. पोलिसांच्या माहितीनुसार अतिक शेख, सादिक शेख, हुसेन कादिरी अशी आरोपींची नावे पटली आहेत. त्यांच्यावर गुन्हा दाखल केला असून पुढील तपास पोलीस निरीक्षक संदिप जनशिवले करीत आहेत.
दरम्यान, आरोपी व फिर्यादी हे ओळखीचे आहेत. फिर्यादीचा भाऊ इम्रान व सादीक शेख याचा भाऊ शब्बीर कादरी यांच्यात २७ डिसेंबरला भांडणे झाली होती. त्याचा राग मनात धरुन अतिक याने हातात पिस्तुल घेऊन ‘यहा के भाई लागे हम है, हमारे नाद को लगे तो जान से हात धो बैठोगे,’ असे बोलून पिस्तुलातून गोळीबार करुन दहशत निर्माण केली. त्यामुळे येत्या काळात पोलिस या भाईगिरीला आळा घालणार का? हे पाहाणं महत्त्वाचे ठरणार आहे.