फोन टॅपिंग प्रकरणी : खडसे नंतर संजय राऊतांनी नोंदवला जबाब…
मुंबई : फोन टॅपिंग प्रकरणात आज संजय राऊतांचा यांचा सामना कार्यालयात मुंबई पोलिसांना जबाब नोंदवला आहे. या आधी राऊत हे जवाब नोंदवण्यासाठी पोलीस ठाण्यात हजर राहणार नाहीत. तर, संबंधित तपास अधिकारी राऊत यांना भेटून जवाब नोंदवणार आहेत, अशी माहिती समोर आली होती. त्यानंतर पोलिसांनी सामनाच्या कार्यालयात जाऊन त्यांचा जबाब नोंदवला आहे. या तपासातून काय माहिती समोर येते हे पाहाणे महत्वाचे ठरणार आहे.
फोन टॅपिंग प्रकरणी गुन्हा दाखल झाल्यानंतर मागिल काही दिवसांपासून मुंबई पोलिसांकडून तपास सुरू आहे. आज या प्रकरणात शिवसेना खासदार संजय राऊत यांचा जबाब नोंदवला आहे. मविआ सरकारच्या सत्ता स्थापनेच्या काळात संजय राऊत, एकनाथ खडसे यांचे फोन टॅप झाल्याचा प्रकार समोर आला आहे. या प्रकरणी 2 मार्च रोजी कुलाबा पोलिसांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथ खडसे आणि शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांचा फोन टॅप केल्याप्रकरणी आयपीएस अधिकारी रश्मी शुक्ला यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे. काही दिवसांपुर्वी एकनाथ खडसे यांचा जबाब नोंदवला होता. आज संजय राऊतांचा जबाब नोंदवण्यात आला आहे.