ताज्या बातम्यादेश - विदेश

मनोज पांडे भारताचे नवे लष्करप्रमुख…

नवी दिल्ली : सध्या लेफ्टनंट जनरल आसलेले मनोज पांडे यांची भारताचे 28 वे लष्करप्रमुख म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. पांडे हे सध्या लष्कराचे उपप्रमुख असून ते लेफ्टनंट जनरल एम. एम. नरवणे यांच्या जागी नियुक्त होणार आहेत. भारताचे विद्यमान लष्करप्रमुख मनोज नरवणे येत्या 30 एप्रिल 2022 ला आपला 28 महिन्यांचा कार्यकाळ पूर्ण झाल्यानंतर या महिन्याच्या अखेरीस नरवणे निवृत्त होणार आहेत. जनरल पांडे हे लष्करप्रमुख होणारे पहिले अभियंता असणार आहेत.

मुळचे नागपूरकर असलेले लेफ्टनंट जनरल मनोज पांडे हे नवे लष्करप्रमुख आसणार आहेत. मागिल ३७ वर्षे सैन्यात कार्यरत असलेले लेफ्टनंट पांडे मूळचे नागपूर येथील आहेत. त्यांची जानेवारी महिन्यातच उपलष्करप्रमुख म्हणून निवड करण्यात आली होती. त्यांच्या सेवेतील अनुभव पहाता हि नियुक्ती करण्यात आल्याचे समजत आहे.

सध्या मनोज पांडे हे लष्करातील सर्वात वरिष्ठ आहेत. आजपर्यंत पांडे यांनी लष्करात विविध महत्वाच्या जबाबदा-या सांभाळल्या आहेत. नागपूर विद्यापीठाच्या मानसशास्त्र विभागाचे माजी प्रमुख ज्येष्ठ मानसतज्ज्ञ डॉ. चंद्रशेखर पांडे आणि नागपूर आकाशवाणीच्या उद्‌घोषिका प्रेमा पांडे यांचे ते पुत्र असून पांडे यांचे लहान बंधू संकेत पांडे लष्करात कर्नल होते. सर्वांत लहान बंधू डॉ. केतन पांडे हे ब्रुनोईच्या राजाचे मुख्य वैद्यकीय अधिकारी होते.

पांडे यांचे प्राथमिक शिक्षण नागपूरस्थित वायुसेना नगरातील केंद्रीय विद्यालयात झाले. अकरावीनंतर केंद्रीय लोकसेवा आयोगाची परीक्षा उत्तीर्ण करून पुण्याच्या नॅशनल डिफेन्स ॲकॅडमीत दाखल झाले. हा तीन वर्षांचा अभ्यासक्रम पूर्ण झाल्यानंतर त्यांनी डेहराडूनच्या मिलिटरी इंजिनीअरिंग कॉलेजमधून अभियांत्रिकीची पदवी मिळवली. १९८२ मध्ये ते पुण्याच्या कोर ऑफ इंजिनीअर्स (बॉम्बे सॅपर्स) या लष्कराच्या अभियांत्रिकी सेवेत रुजू झाले. आणि आता ते लष्कराचे उपप्रमुख असून लवकर भारताच्या लष्कर प्रमुखपदी दिसणार आहेत.

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये