लोकशाही जिंदाबाद..! झारखंडमध्ये नक्षलींच्या ‘दहशतवादा’ला मतदानाने ‘उत्तर’
झारखंड या राज्याचे नाव उच्चारताच आपल्याकडे नक्षलवादाचाही उल्लेख होतो. राज्यातील नक्षल प्रभावी जिल्ह्यांत आजही लोकशाहीला तीव्र विरोध कायम आहे. मुख्य प्रवाहात येण्याऐवजी आदिवासी बांधवांची माथी भडकावून त्यांना लोकशाहीच्या प्रक्रियेत सहभगी होण्यापासून रोखण्याची नक्षलींची धडपड सुरुच आहेत आज (दि. १३) राज्यात विधानसभा निवडणुकीसाठी मतदान सुरु असताना नक्षलींनी असाच प्रयत्न केला. पण सोनपी येथील ग्रामस्थांनी नक्षलवाद्यांचे ‘भ्याड’ आवाहन झुगारत उत्स्फूर्त मतदान केले.
नक्षलवाद्यांचे ‘भ्याड’ आवाहन
झारखंडमध्ये आज दि. १३ सकाळी मतदानाला प्रारंभ झाला. यानंतर राज्यातील पश्चिम सिंगभूममधील सोनपी मतदान केंद्र परिसरात नक्षलींनी सावधान… सावधान… सावधान… मतदानावर बहिष्कार टाका, आपल्या राज्यात आपलं जनसरकार स्थापन करा, असे भ्याड आवाहन करणारे पोस्टर झळकले. अप्रत्यक्षपणे मतदारांसाठी ही धमकीच होती. मात्र मतदान सुरु होताच सोनपी येथील मतदारांनी ही दहशत झुगारल्याचे स्पष्ट झाले.
सोनपी मतदान केंद्रावर उत्स्फूर्त मतदान
नक्षलींनी सावधान… सावधान… सावधान… मतदानावर बहिष्कार टाका, आपल्या राज्यात आपलं जनसरकार स्थापन करा, असे भ्याड आवाहन करणारे पोस्टर हे मतदानांमध्ये अडथळ आणण्याचा प्रयत्न होता. सुरक्षा दलांनी तत्काळ ही पोस्टर हटवले. यानंतर नक्षलींची दहशत झुगारत सोनपी मतदान केंद्रावर ग्रामस्थांनी लोकशाहीच्या उत्सवात आपला सहभाग नोंदवा. मतदारांनी आपल्या लोकशाहीच्या अधिकाराचे पालन करत नक्षलींना मतदानातूनच सडेतोड उत्तर दिल्याचे चित्र सोनपी मतदान केंद्रावर दिसले आहे.