खोटे बोलण्यातच आम्ही कमी पडतो, ते आमच्या रक्तात नाही; उद्धव ठाकरे
uddhav thackerey commented to fadanvis

कोल्हापूर : भाजपवाले कुस्तीसाठी जर मैदानात उतरले तर स्पर्धेआधी ते धाडीच टाकायला लागतील. मर्दान मर्दासारखंच लढायला हवं. कोल्हापूर हा भगव्याचा बालेकिल्ला आहे. अशा शब्दांत शिवसैनिकांशी संवाद साधताना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी भाजपवर टीकास्त्र सोडलं.
सत्यजित कदम यांच्या प्रचारात शनिवारी देवेन्द्र फडणवीस यांनी बोलताना महाविकास आघाडीवर निशाणा साधला होता . त्यालाच प्रत्युत्तर म्हणून आज उद्धव ठाकरे यांनी कोल्हापुरात शिवसैनिकांशी संवाद साधताना निशाणा साधला.
उद्धव ठाकरे म्हणाले, “सर्वप्रथम सर्वांना रामनवमीच्या मी शुभेच्छा देतो. अशी सभा घेण्याची माझी सवय नाही, कारण आपण समोरा-समोर लढणारे मर्द आहोत. कोल्हापूर ही तर मर्दांची भूमी आहे. कालच आपला कुस्तीपटू पृथ्वीराज याने महाराष्ट्र केसरीचा बहुमान मिळवलेला आहे. मला स्वत:ला अभिमान आहे, की पृथ्वीराजच्या रूपाने २१ वर्षानंतर कोल्हापूरला हा बहुमान मिळाला. पृथ्वीराजचं मी मनापासून अभिनंदन करतोच आहे, पण लढायचं कसं आणि ते सुद्धा मर्दाने लढायचं कसं हे या कोल्हापूरच्या मातीतून शिकलं पाहिजे. तरी नशीब ही निवडणूक आहे, राजकीय पक्षांच्या जर का कुस्त्या सुरू झाल्या तर आपल्या समोरासमोर लढणारा मर्द कुणी नाहीए, पण कुस्तीमध्ये जर भाजपा उतरला तर समोरच्या पैलवानाशी कुस्ती खेळण्यापेक्षा आदल्या दिवशी त्याच्यावरती धाडी टाकेल. सीबीआय, ईडी इत्यादींची धाड आणि मग स्वत:मध्ये धमक काही नसताना, मी जे बोललो होतो की मर्दाने मर्दासारखं लढलं पाहिजे आणि मर्दाने कसं लढायचं हे कोल्हापूरच्या मातीतून शिकलं पाहिजे.”