बॅक टू नेचरआरोग्य
चिंच खाल्ल्याने बरे होतात अनेक रोग
मधुर-आंबट चवीची चिंच म्हणजे प्रत्येक भारतीय व्यक्तीच्या बालपणात आवडता असणारा खाद्यपदार्थ आहे. चिंच अत्यंत रुचिकर असून, तिचा वापर थेट औषध म्हणून करता येतो. चिंच खाल्ल्याने अनेक रोग बरे होतात. अनेक रोग तर मुळापासून बरे होतात. जाणून घेऊया उपयोग…
- चिंचेपासून तयार केलेले ‘चिंचालवण तेल’ पोटदुखीवरचे उत्तम औषध आहे. जेवताना भाताच्या पहिल्या घासाबरोबर हे तेल मिसळून घेतले की, पोटदुखीसारखी दुखणी लवकर बरी होतात.
- पिकलेली चिंच वातपित्त आणि कफ अशा तिन्ही दोषांचे शमन करते.
- चिंचेचे सरबत उत्तम पित्तशामक आहे. ज्यांना पित्त वाढून शरीरात उष्णता वाढत चालली आहे असे वाटते, त्यांनी एक कप चिंचेचे सरबत उष्णता कमी होईपर्यंत घ्यावे.
- तोंडाला चव नसेल तर चिमूटभर मीठ लावून पिकलेली आणि मऊ झालेली चिंच खावी.
- हृदयाची ताकद कमी झाली की, पिकून मऊ झालेली काळी चिंच सरबत करून घेतात. हृदयाच्या स्नायूंना ताकद देण्याचे काम चिंच करते.
- मुका मार लागून सूज आली की, चिंचोके (चिंचेच्या बिया) वाटून त्याचा लेप करावा. चिंचेची पाने आणि चिंचेचा गर यांचाही लेप वेदना आणि सूज कमी करणारा आहे.
- काविळीमध्ये खाण्यावरची इच्छा मरून गेली की, रुग्णाला पिकलेली चिंच खायला द्यावी. चिंचेचे सरबत काविळीमध्ये अमृताचे काम करते.
- चिंचेच्या फुलांचा ताजा रस नियमित घेतला तर रक्ती मुळव्याध कमी होते.
- पचनशक्ती वाढवून आरोग्यप्राप्ती करून देणारी चिंच खरंच एक स्वस्तातले औषध आहे.
- चिंचेच्या फुलांचा गुलाबाचा गुलकंद बनवतो तशाच पद्धतीने गुलकंद तयार करावा. तो उत्तम पित्तशामक आहे.