“पुरे झाला देवा आता पंचनामा…”; भातखळकरांचे पवार-मोदी भेटीनंतर खोचक ट्विट
मुंबई: शिवसेना खासदार आणि खासदार संजय राऊत यांच्यावर मंगळवारी ईडीने कारवाई केली आहे. त्यापूर्वी अनिल देशमुख आणि नवाब मलिक यांच्यावरदेखील कारवाई करण्यात आली आहे. त्यामुळे राज्यातील वातावरण चांगलेच ढवळून निघालं आहे. त्यात आज शरद पवार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतल्याने अनेक चर्चांना उधाण आलं आहे.
अशातच आता भाजप नेते अतुल भातखळकर यांनी ट्वीट करत राज्यात सध्या सुरु असलेल्या ईडीच्या कारवांचा संदर्भ देत एक खोचक ट्वीट केले आहे. “पुरे झाला देवा आता पंचनामा, शरण आलो तुझिया धामा…” असं खोचकी वक्तव्य तात्यांनी ट्विटच्या माध्यमातून केलंय. सध्या राज्यात सुरु असलेल्या ईडीच्या कारवायांच्या पार्श्वभूमीवरच ही भेट घेतल्याचे म्हणत भाजप नेते अतुल भातखळकर यांनी खोचक ट्वीट करत राष्ट्रवादीवर टीका केली आहे.
मात्र पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या भेटीनंतर शरद पवार यांनी पत्रकार परिषद घेऊन मोदींच्या भेटीमागची कारणं स्पष्ट केली आहेत. शरद पवारांनी काय स्पष्टीकरण दिलं; खालील लिंकवर क्लीक करून सविस्तर वाचा :