Top 5ताज्या बातम्यारणधुमाळी

मनसे उद्धव ठाकरेंच्या वडीलांनाही हायजॅक करणार का?; पेडणेकरांचा सवाल…

मुंबई : बाळासाहेब ठाकरे हे हयात असताना मनसेने शिवसेना भवनावर दगडफेक केली, त्यांना यातना दिल्या. मनसे आजपर्यंत बाकी सगळं हायजॅक करतच आली आहे, आता तुम्ही उद्धव ठाकरे यांचे वडीलही हायजॅक करणार का?, अशा शब्दात शिवसेना नेत्या किशोेरी पेडणेकर यांनी राज ठाकरेंवर निशाणा साधला आहे.

मनसेवर आगपाखड करताना पेडणेकर म्हणाल्याा की, शिवसेना भवनाला टार्गेट केल्याशिवाय किंवा शिवसेनेवर कुरघोडी केल्याशिवाय मनसेला टीआरपी मिळत नाही. आता मनसेचे नेते आम्ही ‘बी टीम’ म्हणजे बाळासाहेबांची टीम असल्याचे सांगत आहेत. 

तसेच शिवसेनेचे हिंदुत्व हे आजही प्रखर आहे. आम्ही भूमिका बदलल्या असतील पण तुमच्याप्रमाणे स्वार्थ साधण्यासाठी काहीही केलेले नाही. मित्र जेव्हा मित्र राहत नाही आणि समोरून मदतीचा हात पुढे आला तर तो पकडायचा असतो.

दरम्यान बाळासाहेब ठाकरे यांनी मातोश्रीवर एका मुस्लीम व्यक्तीला नमाज अदा करून दिली होती. बाळासाहेब ठाकरे मुस्लिमांविषयी इतके उदारमतवादी होते. त्यामुळे मनसेने उगाच कोणाची तरी भूमिका घेऊन बोलू नये, असं म्हणत राज यांनी केलेल्या वक्तव्याचा खरपूस शब्दात समाचार घ्यायलायाही पेडणेकर यावेळेस विसरल्या नाहीत.

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये