ताज्या बातम्या

‘अकासा एअर’च्या विमानातील ऑफ-ड्युटी पायलटकडून तरुणीचा छळ

पुणे | अकासा एअरलाइन्समधून प्रवास करणाऱ्या एका तरुणीचा छळ करण्यात आल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. अकासा एअरलाइन्समधून प्रवास करणाऱ्या एका 20 वर्षीय तरुणीने तिच्यासोबत अकासा एअरलाइन्समधील ऑफ-ड्युटी असलेल्या पायलटकडूनच छळ झाल्याचे सांगण्यात आले आहे. या घटनेची तक्रार सदर मुलीने विमानातील कर्मचाऱ्यांकडे आणि एअरलाइन्सकडे केली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, तीन महिन्यांची इंटर्नशीप संपवून तरुणी घरी परतत होती. त्या पायलटने पहिल्यांदा सीट बदलून त्याच्याजवळच्या सीटवर बसण्यास भाग पाडले आणि नंतर मद्य देऊ केले, असे तिने सांगितले. तो सतत तिच्याशी बोलण्याचा प्रयत्न करत होता, तिला अत्यंत अस्वस्थ करत होता. पुण्यात उतरल्यावरही त्याचे बेशिस्त वर्तन सुरूच होते, असे तरुणी म्हणाली.

अकासाने प्रकरणाच्या सखोल चौकशीचा आणि सोशल मीडिया टीम तरुणीशी संपर्क साधण्याच्या प्रयत्नात असल्याचा दावा केला आहे. घटनेच्या 15 दिवसांनी, सोमवारी ‘अकासा’ने पोस्टला प्रतिसाद दिला असला तरी अद्याप संपर्क साधला नसल्याचे तरुणीने म्हटले. नेटकरी या घटनेमुळे संताप व्यक्त करीत आहेत.

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये