ताज्या बातम्यामहाराष्ट्ररणधुमाळी
उद्धव ठाकरेंच्या भाषणाला मुख्यमंत्री शिंदेंचं दिल्लीतून उत्तर; म्हणाले…
नवी दिल्ली : (Eknath Shinde On Uddhav Thackeray) आगामी महापालिका निवडणूकीसाठी सर्व पक्ष तयारीला लागले आहेत. नुकताच मुंबईत शिवसेनाप्रमुख उद्धव ठाकरे यांनी गटप्रमुखांचा मेळावा घेतला. ज्यानंतर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ठाकरेंना थेट प्रतित्यूत्तर दिलं आहे. अडीच वर्षानंतर गटप्रमुखांची आठवण आली का? असा खोचक प्रश्न विचारत शिंदे यांनी उद्धव ठाकरेंवर टीकास्त्र सोडलं.
उद्धव ठाकरे यांनी शिंदे गटावर टीका करताना, आतापर्यंत मुलं पळवणारी टोळी ऐकली होती, पण बाप पळवणाऱ्यांची औलाद आता महाराष्ट्रात फिरतेय असा घणाघात केला होता. याबाबत बोलताना शिंदे म्हणाले, ‘आम्हाला अभिमान आहे, आम्ही बाळासाहेबांचे विचार पुढे घेऊन जात आहोत. पण तुम्ही मग बापाचे विचार आणि पक्ष विकणारी टोळी आहात का? असा खोचक प्रश्न विचारला.