ज्येष्ठ अभिनेत्री सुलोचना लाटकर कालवश

मुंबई : साळस आणि घरंदाज अभिनयाचे फिरते व्यासपीठ असलेल्या ज्येष्ठ अभिनेत्री सुलोचना लाटकर (Sulochana Latkar Passed Away) यांनी वयाच्या ९४ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास. काही दिवसांपूर्वी त्यांची प्रकृती खालावल्याने त्यांना दादर येथील एका खासगी रुग्णालयात दाखल केले होते. अखेर रविवारी सायंकाळी सातच्या दरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली. (Veteran Marathi film actress Sulochana Latkar passed away today at the age of 94.)
१९२८ चा जन्म असलेल्या सुलोचना लाटकर (Sulochana Latkar) १९४८ साली मराठी चित्रपटसृष्टीत दाखल झाल्या. ज्येष्ठ दिग्दर्शक आणि कलावंत भालजी पेंढारकर (Bhalji Pendharkar) यांचे त्यांना मार्गदर्शन लाभले. ते त्यांचे गुरू होते. भालजी पेंढारकर यांच्या अनेक ऐतिहासिक चित्रपटात त्यांनी काम केले. राजकपूर, शम्मी कपूर, शशीकपूर या कपूर पिढीबरोबर आणि नंतर, कपूर घराण्याच्या तिसऱ्या पिढीच्या रणधीर कपूर (Randhir Kapoor), ऋषी कपूर(Rushi Kapoor), गीता बाली, बबिता, नीतू सिंग यांच्या बरोबरही त्यांनी हिंदी चित्रपटातील काळ गाजवला.
लाटकर यांनी २५०हून अधिक मराठी तसेच हिंदी चित्रपटांत त्यांनी आपल्या अभियानाची छाप पाडली. वहिनीच्या बांगड्या, मीठ भाकर, धाकटी जाऊ हे त्यांचे काही गाजलेले चित्रपट आहेत. त्यांच्या या कार्याची दखल घेत त्यांना सरकारने महाराष्ट्र भूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते. त्यांची ओळख कायम सुलोचना दीदी (Sulochana Didi) म्हणून राहिली.