‘…तर सुरी पाहिल्यावर मला संजय राऊत यांचा चेहरा आठवतो’- किशोरी पेडणेकर
!['...तर सुरी पाहिल्यावर मला संजय राऊत यांचा चेहरा आठवतो'- किशोरी पेडणेकर kishori pednekar and sanjay raut](https://rashtrasanchar.com/wp-content/uploads/2022/04/kishori-pednekar-and-sanjay-raut.jpg)
मुंबई : झी टीव्हीवरील किचन कल्लाकार हा कार्यक्रम सध्या चांगलाच चर्चेत आहेत. या शोच्या मंचावर आत्तापर्यंत दिग्गज कलाकारांपासून ते राजकारण्यांपर्यंत अनेकांनी हजेरी लावली आहे. सुरुवातीपासूनच या कार्यक्रमानं प्रेक्षकांच्या मनात आपली जागा कायम केली आहे. तसंच नुकतीच या कार्यक्रमात मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर, राष्ट्रवादीच्या रुपाली ठोंबरे आणि भाजपच्या चित्रा वाघ यांनी हजेरी लावली होती होती.
झी मराठीच्या अधिकृत इन्स्टाग्राम अकाउंटवर एक व्हिडीओ शेअर केला आहे. ज्यात किशोरी पेडणेकर यांनी संजय राऊत यांच्याबाबत केलेलं वक्तव्य सर्वाधिक चर्चेत आहे. या शोमध्ये किशोरी पेडणेकर यांना एक टास्क देण्यात आला होता. या टास्कमध्ये त्यांना दिल्या गेलेल्या बॉक्समधून ज्या वस्तू निघतील त्या पाहून कोणचा चेहरा आठवतो हे त्यांना सांगायचं होतं. या धम्माल टास्कमध्ये किशोरी पेडणेकर यांनी संजय राऊत यांचं नाव घेतलं.
किशोरी पेडणेकर यांनी या टास्कमध्ये फारच मजेदार उत्तरं दिली. त्यांनी जिलबी पाहिल्यानंतर आमदार गिरीश महाजन आठवतात असं म्हटलं. तर सुरी पाहिल्यावर मला शिवसेना नेते संजय राऊत यांचा चेहरा आठवतो असं सांगितलं. किशोरी पेडणेकर यांना देण्यात आलेल्या बॉक्समध्ये भोंगा देखील होता. यावर भोंगा पाहिल्यावर किरीट सोमय्या यांची आठवण येते असं किशोरी पेडणेकर यांनी सांगितलं आणि यावर चित्रा वाघ यांनीही ‘भोंग्याने जाग येते सर्वांना झोपू शकत नाही कोणी’ असा विनोदी टोला लगावला. तसंच किशोरी पेडणेकरांचा हा मजेशीर व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे.