ताज्या बातम्यामहाराष्ट्ररणधुमाळी

पंतप्रधान मोदींनी सांगावं वेंदाताचा प्रकल्प महाराष्ट्रातून कसा गेला – उद्धव ठाकरे

मुंबई : (Uddhav Thackeray On PM Narendra Modi) राज्यातील वेदांता-फॉक्सकॉन प्रकल्प महाराष्ट्रातून गुजरातमध्ये गेला. यावरुन राज्यात बराच मोठा वाद रंगला आहे. या प्रकरणावरुन शिवसेनापक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांनी थेट पंतप्रधानांना प्रश्न विचारला आहे. वेंदाताचा प्रकल्प महाराष्ट्रातून कसा गेला याचं उत्तर पंतप्रधानांनी द्यावं असा सवाल त्यांनी केला आहे.

पुढे बोलताना ठाकरे म्हणाले, मिंधे गट फक्त शेपट्या हलवून होय महाराजा म्हणत आहेत. महाराष्ट्राची बाजू घेऊन दिल्लीत का बोलत नाही? सांगा की पंतप्रधानांना हा प्रकल्प कसा काय गेला, म्हणजे हे अगोदरच ठरलं होतं का? असा सवाल करताना उद्धव ठाकरेंनी शिंदे गटावर हल्लाबोल केला.

उद्धव ठाकरे म्हणाले, महाराष्ट्रातील नोकऱ्या चालल्या आहेत. वेदांताचा प्रकल्प इथून गेला पण याच्याबद्दल शिंदे-फडणवीस सरकार धांदात खोटं बोलत आहे. हा प्रकल्प महाराष्ट्रात पुन्हा आणा, महाराष्ट्रातून एकेक उद्योग निघून जात आहेत.

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये