ताज्या बातम्यामनोरंजनमहाराष्ट्र

‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ला लागणार ब्रेक! कलाकरांनी सांगितलं ‘हे’ कारण, अन् म्हणाले

छोट्या पडद्यावरील ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ हा कार्यक्रम घराघरात लोकप्रिय आहे. गेले अनेक महिने हा कार्यक्रम प्रेक्षकांचे भरपूर मनोरंजन करत आला आहे. हा कार्यक्रम अल्पावधीतच प्रेक्षकांच्या पसंतीस पडला. अनेक कलाकारांना या कार्यक्रमाने नवी ओळख दिली. या कार्यक्रमातील सर्व कलाकारांना प्रेक्षकांचं नेहमीच भरभरून प्रेम मिळत असतं. परंतु आता हा कार्यक्रम काही काळासाठी प्रेक्षकांची रजा घेणार आहे.

‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’मधील कलाकारांचा चाहतावर्ग खूप मोठा आहे. या सर्वांच्या उत्स्फूर्ततेचं आणि विनोदाचं प्रेक्षक नेहमीच कौतुक करत असतात. हे सर्व कलाकारदेखील सोशल मीडियावर सक्रिय राहून त्यांच्या व या कार्यक्रमाच्या पडद्यामागे घडणाऱ्या गोष्टी चाहत्यांशी शेअर करत असतात. आता या कार्यक्रमातील कलाकारांनी काही फोटो शेअर करत हा कार्यक्रम काही काळासाठी ब्रेक घेणार असल्याचं सांगितलं.

या कार्यक्रमातील प्रियदर्शनी इंदलकर, रसिका वेंगुर्लेकर, गौरव मोरे अशा अनेक कलाकारांनी इन्स्टाग्रामवर या कार्यक्रमाच्या शूटिंगच्या शेवटच्या दिवसाचे काही क्षण शेअर केले. फोटो पोस्ट करत प्रियदर्शनीने लिहिलं, “दोन महिन्यांनंतर भेटू…” तर रसिका वेंगुर्लेकर म्हणाली, “शेवटच्या शेड्युलचा शेवटचा दिवस… या माझ्या अतरंगी मित्रांबरोबर शेवटचे काही क्षण…” हे फोटो पाहिल्यावर रसिकाच्या चाहत्यांचा असा समज झाला की, हा कार्यक्रम प्रेक्षकांचा कायमचा निरोप घेणार आहे.

तर त्यानंतर तिने या सेटवरील एक फोटो पोस्ट करत लिहिलं, “काळजी करू नका… हा कार्यक्रम बंद होत नाहीये. आम्ही ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ची संपूर्ण टीम छोटीशी सुट्टी घेत आहोत. आम्ही लवकरच पुन्हा तुमच्या भेटीला येऊ.” या सर्व कलाकारांनी शेअर केलेले हे फोटो सध्या खूप चर्चेत आले आहेत. हे सर्व कलाकार पुन्हा त्यांच्या भेटीला कधी येणार याची आता चाहते वाट बघत आहेत.

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये